Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचा नवा दृष्टिकोन! भविष्यात विद्यापीठ निर्मितीचा विचार केला जाहीर

विद्या प्रसारक मंडळ ठाणे आपल्या 90 वर्षांच्या प्रवासानिमित्त 30 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे कॉलेज कॅम्पसमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 28, 2025 | 06:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • भविष्यात विद्या प्रसारक मंडळ नवीन विद्या शाखा सुरू करणार.
  • हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य
  • सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे
आपल्या 90 गौरवशाली वर्षांची पूर्तता साजरी करताना विद्याप्रसारक मंडळ ठाणे यांनी या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. 1935 पासूनच्या संस्थेच्या वाटचालीचा 90 वर्षापूर्वीचा टप्पा साजरा करण्या साठी रविवार 30 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत ठाणा कॉलेज परिसरात टर्फ वर विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित ओंकार दादरकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच प्रसिद्ध बासरी वादक पंडित राकेश चौरसिया यांची मंत्रमुग्ध करणारी बासरी-वादनाची मैफल होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कृती यांचा संगम घडवण्याच्या विद्या प्रसारक मंडळाच्या प्रदीर्घ परंपरेचे तसेच अनेक पिढ्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे प्रतिबिंब दिसून येते.

Buldhana News : जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात; शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रमांचे आयोजन

चेंदणी रोड कॅम्पस, ज्याला ठाणे कॉलेज आणि बेडेकर कॉलेज या नावांनीही ओळखले जाते, येथे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायदा अशा विविध शाखांचे शिक्षण देण्यात येते. हा कॅम्पस आज ठाण्यातील सर्वात समृद्ध उच्चशिक्षण केंद्रांपैकी एक मानला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, आधुनिक पायाभूत सुविधा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड यासाठी विद्या प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलाची खास ओळख आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि सक्रीय प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व नोकरीच्या संधी सतत उपलब्ध होत असतात. संस्थेच्या वारशाबद्दल बोलताना डॉ. महेश बेडेकर यांनी अभिमान व्यक्त करत म्हटले: “विद्याप्रसारक मंडळ हा ठाण्याचा खरा स्वभाव मांडतो—शिस्तबद्ध, प्रगतिशील आणि शिक्षणाशी घट्ट बांधलेला. आमचे विद्यार्थी केवळ शिक्षणच नव्हे, तर मूल्ये, संधी आणि दिशा घेऊन येथून बाहेर पडतात. कोकण प्रदेशातही विद्याप्रसारक मंडळाचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे; दृष्टीने सुंदर आणि वास्तवात सहजतेने राबवता येतील अशी संस्थांची निर्मिती ते सातत्याने करीत आले आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने विद्या प्रसारक मंडळ हे ठाण्याच्या शैक्षणिक पटलावरील मानबिंदू ठरले आहे.

यावेळी बोलताना डॉ. महेश बेडेकर म्हणाले की ,गेल्या नऊ दशकांत विद्या प्रसारक मंडळाने शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्थांच्या विस्तृत जाळ्यात रूपांतर केले आहे, जे आज दररोज जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करते. ठाण्यातील नौपाडा ,चेंदणी रोड आणि कोकणातील वेळणेश्वर या तीन प्रमुख कॅम्पसमधून मंडळ हे प्राथमिक शिक्षणापासून ते पीएचडी पर्यंतचे उच्च शिक्षण उपलब्ध करून देते.कायदा, विज्ञान, कला ,वाणिज्य,व्यवस्थापन, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचे 3 लाखांहून अधिक माजी विद्यार्थी आज संपूर्ण जगात अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. 2009 साली स्थापन केलेली London Academy of Education and Research सारखे आंतरराष्ट्रीय उपक्रम आणि भविष्यात स्वतःचे विद्यापीठ स्थापण्याची दृष्टी या माध्यमातून VPM ठाणे आणि कोकणातील शैक्षणिक क्षेत्र घडवत आहे. 90 वर्षे पूर्ण करताना मंडळ,ज्यांनी ही परंपरा घडवली आणि आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाला बळ देत आहेत, अशा आपल्या संस्थापक, देणगीदार, प्राध्यापक,कर्मचारी, हितचिंतक आणि विद्यार्थ्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे.

चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच…

हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे तरी सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी डॉ .महेश बेडेकर यांनी केले.

Web Title: New vision of thane vidya prasarak mandal announced the idea of creating a university in the future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.