Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांसाठी नवे शैक्षणिक अ‍ॅप; ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती येणार पाहता

‘निपुण महाराष्ट्र SCERTM’ या नवीन मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घरबसल्या पाहू शकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 04, 2025 | 05:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक आता आपल्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती मोबाईलद्वारे सहज तपासू शकतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ नावाचे नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अँपचे वापर येत्या शैक्षणिक वर्षात करण्यात येईल.

NEET च्या परीक्षेमुळे मेगाब्लॉक रद्द! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. शिक्षकांनी केलेल्या मेहनतीस पालकांच्या पाठिंब्याची जोड मिळावी व शैक्षणिक सूचना प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या अ‍ॅपचा मुख्य हेतू आहे. ‘निपुण भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी हे एक पाऊल ठरणार आहे. एप्रिल 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात या अ‍ॅपचा प्रायोगिक वापर यशस्वीपणे पार पडला. अमरावती जिल्ह्यातही अंगणवाड्यांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यात आले.

या अ‍ॅपमध्ये पालकांना अ‍ॅप वापरण्याबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून पालकांना अ‍ॅपच्या विविध सुविधा, लॉगिन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची प्रगती कशी पाहावी, तसेच घरबसल्या सराव कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी कमी परिचय असलेले पालक सुद्धा अ‍ॅप सहजपणे वापरू शकतील. यासोबतच, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना प्रत्येक वर्गासाठी पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून नोंदवण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले आहेत, जेणेकरून अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत वेळेवर व अचूक माहिती पोहोचू शकेल.

‘Beauty With Brain’ याचं उत्तम उदाहरण; देशात 116 व्या रँकने आशना झाली IPS अधिकारी

या अ‍ॅपमध्ये पालकांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओही उपलब्ध असतील जे त्यांना अ‍ॅप वापरण्यास सुलभ ठरतील. सध्या शाळांना वर्गनिहाय पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. येत्या काळात शाळांमधील विविध उपक्रम, उत्सव आणि सूचना या अ‍ॅपमधून थेट पालकांपर्यंत पोहोचणार आहेत. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ अ‍ॅपमुळे शालेय शिक्षण अधिक सुलभ व तंत्रस्नेही होणार आहे.

Web Title: Nipun maharashtra app educational progress parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

गोंदियात मुख्याध्यापक व केंद्र संचालक निलंबित; जिल्हा परिषदेच्या सीईओंची धडक कारवाई
1

गोंदियात मुख्याध्यापक व केंद्र संचालक निलंबित; जिल्हा परिषदेच्या सीईओंची धडक कारवाई

नर्सिंग आणि DPN/PHN सीईटी प्रवेश नोंदणीस अंतिम मुदतवाढ, तत्काळ नोंदणीसाठी आवाहन
2

नर्सिंग आणि DPN/PHN सीईटी प्रवेश नोंदणीस अंतिम मुदतवाढ, तत्काळ नोंदणीसाठी आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.