फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स (NCSM) ही भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने गट ‘क’ मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहिर केली आहे. टेक्निशियन, टेक्निकल असिस्टंट, आर्टिस्ट आणि ऑफिस असिस्टंट ग्रेड-III या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही पदे कोलकाता, भुवनेश्वर आणि ढेंकनाल येथील NCSM च्या युनिट्समध्ये उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 23 मे 2025 आहे.
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम लेखी/अॅप्टिट्यूड चाचणी होईल. यानंतर संबंधित पदांनुसार कौशल्य चाचणी घेतली जाईल. टायपिंग, टेक्निकल किंवा ट्रेड कौशल्य तपासले जाईल. अंतिम टप्पा दस्तऐवज पडताळणीचा असेल. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र ईमेलद्वारे पाठवले जाईल. निवड अंतिम गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.ncsm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Career’ विभागात जाहिरात क्रमांक 05/2025 वर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹८८५ (GST सहित) असून SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि महिलांसाठी शुल्क माफ आहे. पदांनुसार पात्रता अशी आहे की टेक्निशियन-A (13 पदे) पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे १ ते २ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. तसेच नियुक्त उमेदवाराला वेतनश्रेणी ₹१९,९०० ते ₹६३,२०० (लेव्हल २) असेल अशी शक्यता आहे. टेक्निकल असिस्टंट-A (9 पदे) पदासाठी उमेदवार संबंधित शाखेतील डिप्लोमा प्रमाणपत्र धारक किंवा BCA/IT प्रोग्राम मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे. वेतन ₹29,200 ते ₹92,300 (लेव्हल 5) इतके असेल.
आर्टिस्ट-A (2 पदे) पदासाठी उमेदवार दहावी फाइन/कॉमर्शियल आर्ट्समधील डिप्लोमा प्रमाणपत्र धारक असवा. उमेदवाराकडे 1–2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट ग्रेड-III (6 पदे) पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इंग्रजीत 35 WPM किंवा हिंदीत 30 WPM टायपिंग स्पीड असणे अनिवार्य आहे. या सर्व पदांसाठी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.