फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) विलासपूर येथे वरिष्ठ निवासी (Senior Resident) रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले आहे. ही भरती ६ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. परंतु, आवश्यकतेनुसार ती ३ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट [aiimsbilaspur.edu.in](https://aiimsbilaspur.edu.in) वर जाऊन अर्ज करावा.
या भरतीसाठी मुलाखत २९ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांची कागदपत्र तपासणी केली जाईल. या भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. उमेदवाराकडे MD/MS/DNB पदव्युत्तर वैद्यकीय पदवी असावी. नॉन-मेडिकल उमेदवारांसाठी M.Sc + PhD आवश्यक आहे. सर्व उमेदवारांची केंद्रीय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या वयोमर्यादा संबंधित अटीनुसार, उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच पगार Senior Resident (Non-Academic) पदासाठी पगार 67,700 रुपये ठरवण्यात आले आहे. Non-Medical (M.Sc + PhD) पदासाठी दरमाह वेतन ₹56,100/- इतके निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ₹590/- इतकी रक्कम भरावी लागणार आहे. दिव्यांग (PwBD) प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी मोफत अर्ज करता येणार आहे. तर इतर उमेदवारांना ही रक्कम ₹1,180/- (₹1,000 + 18% GST) इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही भरती Walk-In Interview पद्धतीने होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
1. अधिकृत वेबसाइट [aiimsbilaspur.edu.in](https://aiimsbilaspur.edu.in) ला भेट द्या.
2. ‘Online Application’ वर क्लिक करा.
3. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
4. शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
5. अर्जाची प्रिंटआउट घेऊन ठेवा.