Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांवर ओढवले संकट! 5 तारखेपर्यंत शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश, विद्यार्थ्यांची संख्या 20 खाली तर त्यांना शिक्षक नाही…

जर विद्यार्थ्यांचा पट २० खाली असेल तर त्यांना शिक्षक नाही, असा नियम काढण्यात आला आहे. त्यामुळे लहान आकाराच्या शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 23, 2025 | 02:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षण संचालकांनी जारी केलेले आदेश मागे घेण्याची मागणी
  • तिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण
  • शाळांमध्ये ‘शून्य शिक्षक’ अशी चिंताजनक स्थिती निर्माण
दहावीच्या परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना शिक्षण विभागाने सुरू केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रक्रियेमुळे मुंबईतील मराठी तसेच इतर भाषिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप मुंबई मुख्याध्यापक संघटना (उत्तर विभाग) अध्यक्ष आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केला आहे. त्यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शिक्षण संचालकांनी जारी केलेले आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.

AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचंय? कशी करावी तयारी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

इयत्ता ९वी व १०वीसाठी संचमान्यतेत केलेल्या बदलांमुळे ही समस्या अधिक तीव्र झाल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले. नवीन नियमानुसार प्रत्येक वर्गात किमान २० विद्यार्थी असतील तरच त्या वर्गासाठी एक शिक्षक देण्याची तरतूद आहे. मुंबईतील अनेक शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने त्या शाळांमध्ये ‘शून्य शिक्षक’ अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी 9वी आणि 10वीच्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या काहीही असली तरी प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळत होता. मात्र, 15 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या नवीन GR नंतर हजारो शिक्षक “अतिरिक्त” श्रेणीत ढकलले गेले असून त्यांचे इतरत्र समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना 5 डिसेंबरपर्यंत ही समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या घाईगडबडीत शाळांचे नियमित अध्यापन कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या शून्य दाखवली जात असल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण कसा होणार, हे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या तोंडी परीक्षांपासून ते विज्ञान प्रात्यक्षिकांपर्यंत सर्व कामकाज कोण करणार याबाबत पालक आणि शिक्षक दोघांतही मोठी चिंता आहे.

अनेक शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत बिकट आहे. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना शिक्षक ना दिल्याने त्या शाळांतील दहावीचे विद्यार्थी पूर्णपणे दिशाहीन होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शाळांना पुरेसे शिक्षक न मिळाल्यास शैक्षणिक नुकसान तर होईलच, पण लहान शाळा बंद पडण्याच्या मार्गावरही येऊ शकतात, असा इशारा मुख्याध्यापक संघटनेने दिला आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत

अनिल बोरनारे यांनी २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना तरीही किमान तीन विषय शिक्षक देणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. अशा शाळांना योग्य शिक्षकवर्ग उपलब्ध करून दिला तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहील आणि शाळांची गुणवत्ता टिकून राहील, असे ते म्हणाले. शाळांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टळावे यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. शिक्षकांचे समायोजन लागू करण्याचा उद्देश योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी तर्कसंगत आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन होणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षण क्षेत्रातून मत व्यक्त केले जात आहे. येत्या काही दिवसांत याबाबत शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Orders to adjust teachers by the 5th if the number of students is below 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु
1

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी
2

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
3

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी
4

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.