Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील इंदिरा विद्यापीठ आणि MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाशी केली फिलिप्सची भागीदारी

शिक्षणानंतर उद्योग क्षेत्रात चांगलं काम करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. फिलिप्सने पुण्यातील इंदिरा विद्यापीठ आणि MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नोलॉजी विद्यापिठासह यासाठी भागीदारी केली आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 08, 2025 | 01:11 PM
पुण्यातील विद्यापिठांचा करार

पुण्यातील विद्यापिठांचा करार

Follow Us
Close
Follow Us:
  • अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनची सुरूवात
  • 50 तासांहून अधिक मिश्र शिक्षण पद्धतीची ऑफर, ज्यात वर्गातील मार्गदर्शनासोबत ऑनलाइन मॉड्युल्सचा समावेश असेल, जेणेकरून विद्यार्थी उद्योग-तयार कौशल्ये विकसित करू शकतील
  • भारत सरकारच्या ‘स्किल इंडिया मिशन’शी सुसंगत आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणा (एनईपी)नुसार उद्योग-संलग्न, अनुभवाधारित शिक्षणाला पाठिंबा देते
फिलिप्स यांनी पुण्यातील इंदिरा विद्यापीठ आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठासोबत शैक्षणिक भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्यांच्या पदवी अभियांत्रिकी आणि पहिल्या वर्षाच्या एमबीए अभ्यासक्रमात सर्वसमावेशक प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशन सुरू केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दोन्ही कॅम्पसमध्ये करण्यात आला.

या उपक्रमामुळे तांत्रिक शिक्षणातील महत्त्वाची पोकळी भरून निघणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनची मागणी सातत्याने वाढत असतानाही सध्या फारच कमी संस्थांकडे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे, ज्यामुळे कुशल प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंटर्न्स आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील व्यावसायिकांची गरज पूर्ण होत नाही.

शिक्षणातून उद्योगात जाणाऱ्यांना फायदा 

या भागीदारीद्वारे फिलिप्सचा उद्देश शिक्षणातून उद्योगात जाणारा दुवा अधिक मजबूत करणे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आधारित, नेतृत्वकेंद्रित आणि भविष्यातील गरजांशी सुसंगत अशा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्यांचा समावेश करण्यात येत आहे, जे उद्योगात प्रचलित सर्वोत्तम पद्धतींशी जोडलेले आहेत.हा उपक्रम प्रतिभाविकासातील सखोलता, अनुप्रयुक्त शिक्षण, जबाबदारीची जाणीव आणि वर्तनातील उत्कृष्टता वाढविण्याच्या फिलिप्सच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो. हे सर्व गुण यशस्वी प्रोजेक्ट मॅनेजर्ससाठी अत्यावश्यक मानले जातात.

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव

दोन विद्यापिठांमध्ये होणार सुरूवात 

हा कार्यक्रम सुरुवातीला या दोन भागीदार विद्यापीठांमध्ये राबवला जाणार असून लवकरच इतर संस्थांपर्यंतही त्याचा विस्तार करण्याची योजना आहे. या स्पेशलायझेशनमध्ये 50 तासांचे वर्गांमधील आणि ऑनलाइन प्रशिक्षण समाविष्ट आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षित विद्यापीठीय प्राध्यापक आणि फिलिप्सचे तज्ञ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाईल. फिलिप्स विद्यापीठांना अभ्यासक्रमाचे साहित्यही उपलब्ध करून देईल, ज्यामुळे प्रशिक्षित प्राध्यापकांना त्यांच्या विद्यमान शैक्षणिक रचनेत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे सोपे जाईल. उद्योगातील अनुभव वाढवण्यासाठी फिलिप्सचे प्रोजेक्ट मॅनेजर्स प्रत्येक तिमाहीत दोन्ही कॅम्पसमध्ये गेस्ट लेक्चर घेणार आहेत.

कसे असणार धोरण 

हा उपक्रम ‘स्किल इंडिया मिशन’शी पूर्णपणे सुसंगत आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 2020) ला देखील बळकटी देतो. दोन्ही धोरणांमध्ये उद्योग–शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य आणि अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित शिक्षणाचा उच्च शिक्षणात समावेश करण्यावर भर दिला आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांना उद्योग-तयार प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्ये मिळाल्याने त्यांची रोजगारयोग्यता वाढेल आणि भविष्यात बदलत्या कामकाजाच्या गरजांसाठी ते अधिक तयार होतील.

या स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या संधी फक्त फिलिप्सपुरती मर्यादित राहणार नाही, तर विविध संस्था आणि उद्योगांमध्ये मिळू शकतील. प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही विविध विभागांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये लागू होणारी महत्त्वाची कुशलता असल्यामुळे विद्यार्थी अभियांत्रिकी, उत्पादन विकास, ऑपरेशन्स, तंत्रज्ञान आणि इतर प्रोजेक्ट-केंद्रित क्षेत्रांमध्ये विस्तृत करिअर पर्यायांचा लाभ घेऊ शकतील.

विद्यापिठांसह भागीदारी 

फिलिप्सचे हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख रोहित साठे म्हणाले, “फिलिप्समध्ये आम्ही पुढील पिढीतील व्यावसायिकांना सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो, जेणेकरून ते भारतातील झपाट्याने बदलणाऱ्या इनोव्हेशन क्षेत्रात गुंतागुंतीचे आणि प्रभावी प्रोजेक्ट्स सक्षमपणे हाताळू शकतील. इंदिरा विद्यापीठ आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठासोबतची आमची भागीदारी विद्यार्थ्यांपर्यंत थेट उद्योगमानक प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रशिक्षण पोहोचवते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रत्यक्ष जगातील आव्हानांसाठी तयारी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीपासूनच मजबूत होते.”

Bigg Boss 19 विजेता Gaurav Khanna चे शिक्षण आहे अफाट, कानपूर-मुंबईत घेतलंय शिक्षण

तज्ज्ञांचे म्हणणे 

भागीदारीबद्दल बोलताना इंदिरा विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरू डॉ. अनघा जोशी म्हणाल्या, “फिलिप्ससोबत या परिवर्तनात्मक उपक्रमासाठी आम्ही भागीदारी करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. उद्योगाशी सुसंगत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्ये आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष जगातील आव्हानांसाठीची तयारी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होतील.”

MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉ. मघेश कराड म्हणाले, “जागतिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही भागीदारी उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संरचित प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनच्या सुरूवातीमुळे विद्यार्थ्यांना अत्यंत मागणी असलेली कौशल्ये मिळतील आणि ते गतिशील व गुंतागुंतीच्या प्रोजेक्ट वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार होतील.”

Web Title: Philips partners with indira university pune and mit university of art design and technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • education
  • education news
  • Pune University

संबंधित बातम्या

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव
1

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव

भारतीयांना डॉक्टर बनवतेय Philippines, मेडिकल डिग्रीसाठी टॉप युनिव्हर्सिटी वाचा यादी
2

भारतीयांना डॉक्टर बनवतेय Philippines, मेडिकल डिग्रीसाठी टॉप युनिव्हर्सिटी वाचा यादी

Pune News: पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी मुदतवाढ की वेळकाढूपणा? चेंडू राज्यपालांच्या कोर्टात
3

Pune News: पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी मुदतवाढ की वेळकाढूपणा? चेंडू राज्यपालांच्या कोर्टात

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; धानोरात तहसील कार्यालयावर शिक्षकांची धडक
4

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; धानोरात तहसील कार्यालयावर शिक्षकांची धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.