Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्गमध्ये १९ जूनपासून पोलीस भरती सुरु, ४० अधिकारी आणि २०० पोलीस कर्मचारी तैनात

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी १८ जून रोजी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ४० पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस कर्मचारी या भरतीचे काम करणार असून पोलीस दलाच्या या भरतीसाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज झाले आहेत अशी माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 18, 2024 | 11:18 AM
सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक

सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याची पोलीस भरती दिनांक १९ जून पासून सुरू होत आहे. राज्यभर असलेल्या या पोलीस भरतीमध्ये एका उमेदवाराने अनेक पदांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज दाखल केले असले तरी त्या उमेदवाराला या भरतीत सहभागी होण्याची पूर्ण संधी दिली जाणार आहे. १४२ पदांच्या या भरतीसाठी पहिल्या दिवशी ५०० आणि दुसऱ्या दिवशी ७५० उमेदवारांना प्रत्येक दिवशी बोलावण्यात आले आहे. ४० पोलीस अधिकारी आणि २०० पोलीस कर्मचारी या भरतीचे काम करणार असून पोलीस दलाच्या या भरतीसाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज झाले आहेत अशी माहिती सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सौरभ कुमार घरवाले यांनी दिली.

या पत्रकार परिषदेच्या वेळी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे, अधीक्षक श्री निलेश नाईक, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील ११८ पोलीस शिपाई आणि २४ चालक मिळून एकूण १४२ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होत आहे. पावसाचे दिवस असले तरीही भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निःपक्ष पातीपणाने होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उमेदवारानी ऑनलाइन अर्ज आणि पावती उमेदवारांची कागदपत्रे आणि फोटो यासह पोलीस परेड ग्राउंडवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ११८ पोलीस शिपाई (५ बॅण्डस्मन पदासह) आणि २४ चालक पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी दि. /०३/ २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करुन दि.०५/०३/२०२४ ते दि.१५/०४/२०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यासाठी policerccruitment२०२४.mahait.org या संकतस्थळावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्याप्रमाणे पोलीस शिपाई पदासाटी ५९२० बॅण्डस्मन पदासाटी ७८२ आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी १३३९ असे एकूण ८०४२ उमेदवारांचे आवेदन अर्जं प्राप्त झाले आहेत. आवेदन अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी दि.१९/०६/२०२४ ते ०१/०७/२०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर घेण्यात येणार आहे. याकरिता उमेदवारांना दि. १९/०६/२०२४ ते ०१/०७/२०२४ या कालावधीत टप्याटप्याने महाआयटी विभागाकडून प्रवेशपत्र उमेदवारांच्या ई-मेल/एसएमएस या माध्यमांद्वारे जोडण्यात आले आहेत. सद्या पाऊसाचा हंगाम सुरु झाल्याने ज्यादिवशी पाऊस जास्त असेल त्यादिवशी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, उंची, छाती मोजमाप घेऊन दि.०२/०७/२०२४ रोजी नंतर पावसाचे वातावरण पाहून मैदानी चाचणीकरीता बोलाविण्यात येणार आहे. मैदानी चाचणीवेळी उमेदवारांना शारीरिक इजा पोहोचू नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आलेली असून त्याकरीता वैद्यकिय पथक उलपब्ध ठेवण्यात आलेले आहेत. ज्या उमेदवारांनी (पोलीस शिपाई बॅण्डस्मन चालक पोलीस शिपाई।सशस्त्र पोलीस शिपाई।कारागृह शिपाई) या पदाकरीता आवेदन अर्ज भरलेले आहेत अशा उमेदवारांना या एकाच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी पदाकरीता उपस्थिती नसल्यास अशा उमेदवारास पहिल्या ठिकाणी हजर राहील्याबाबतचा लेखी पुरावा दिल्यानंतर त्या उमेदवारांना या पदाच्या भरतीसाठी दुसरी तारीख देण्यात येणार आहे. या घटकात आवेदन अर्ज भरलेला उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचीत रहाणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे

सदर भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शक पार पाडली जाणार असून भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होणार नाही याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ओळखी संदर्भात किंवा अन्य प्रकाराचे आमिष दाखवून आर्थिक देवाण घेवाणीचे गैरव्यवहार करुन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदर्ग येथे समन्वय अधिकारी म्हणून स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती पोलीस नियंतरण कक्ष, सिंधुदुर्ग येथील व्हॉटस्अंप क्र. ८२७५७७६२१३ वर आणि दुरध्वनी क्र. ०२३६२ २२८२०० वर तात्काळ दयावी असे आवाहन पोलीस अधीकषक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

Web Title: Police recruitment started in sindhudurg from june 19

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • Police Recruitment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.