Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थापना दिनानिमित्त पोलिस रेजिंग डे सप्ताह! आधुनिक शस्त्रसज्जतेचे दर्शन; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलिसिंगचा अनुभव

पोलिस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान पोलिस रेजिंग डे सप्ताह–२०२६ अंतर्गत ग्रामीण पोलिस मुख्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 04, 2026 | 09:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पोलिस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. २ ते ८ जानेवारीदरम्यान साजऱ्या होत असलेल्या पोलिस रेजिंग डे सप्ताह–२०२६ अंतर्गत ग्रामीण पोलिस मुख्यालयात विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी माहितीपूर्ण, अनुभवाधारित व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे पोलिस दलाची कार्यपद्धती, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक साधनसज्जता यांचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना घेता येत आहे.

CET परीक्षा दोनदा; प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल! नोंदणीला आठवडाभरात सुरुवात

या सप्ताहांतर्गत चैतन्य टेक्नो स्कूलमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांसह पोलिस मुख्यालयास शैक्षणिक भेट दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि पोलिस उप अधीक्षक गौतम पातारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलिस विभागाची रचना, शिस्तबद्ध कार्यप्रणाली, कायद्याचे महत्त्व तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देत पोलिसिंगविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला.

विद्यार्थ्यांसाठी शस्त्र विभागाची माहिती, श्वान पथकाचे थरारक प्रात्यक्षिक, फॉरेन्सिक व्हॅनद्वारे वैज्ञानिक तपास पद्धती, अंगुलीमुद्रा तज्ज्ञांचे कार्य तसेच दंगा नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष वाहनाचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.

याशिवाय डायल-११२ आपत्कालीन सेवेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सायबर युनिटमार्फत सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणूक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन, वाहतूक शाखेमार्फत रस्ते सुरक्षा नियमांची माहिती तसेच भरोसा सेलमार्फत महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध मदत यंत्रणांची माहिती देण्यात आली. या सत्रांमुळे दैनंदिन जीवनात कायदा व सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक बळकट झाली.

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

पोलिस मुख्यालयातील गोकुळ मैदानावर उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात अत्याधुनिक शस्त्रसाठा, बॉम्बशोधक व नाशक पथक, दामिनी पथक, महिला व बालविषयक कायदे, बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच पोलिस काका–पोलिस दीदी संकल्पनेतून जनजागृती करण्यात येत आहे. हे प्रदर्शन रविवार वगळता दि. ८ जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. हा उपक्रम पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पोलिस दलाच्या कार्याची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिस दलाबद्दल आदर, विश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Police raising day week on the occasion of the founding day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Police Recruitment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.