Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदा नाही तर तब्बल दोनदा UPSC केली उत्तीर्ण! देशातील पहिली अंध IAS

दृष्टी नसतानाही प्रांजळ पाटील यांनी दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी होण्याचं स्वप्न साकारलं. त्यांचा संघर्ष आणि जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 25, 2025 | 01:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडथळे येतात, पण काही लोक त्या अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करतात. अशाच एका जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे. प्रांजळ पाटील यांची, ज्यांनी दृष्टिहीन असूनही दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण करत देशातील पहिल्या अंध IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला.

NMDC भरती 2025 : 683 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी संधी; त्वरित करा अर्ज

प्रांजळ यांचा जन्म महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची दृष्टी कमकुवत होती आणि केवळ सहा वर्षांच्या वयात त्यांनी पूर्णपणे दृष्टी गमावली. मात्र ही अपंगता त्यांच्या आत्मविश्वासावर कधीही परिणाम करू शकली नाही. त्यांनी ही परिस्थिती स्विकारली नाही, तर तिचा सामना करत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला. मुंबईतील कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाइंड येथून प्रांजळ यांनी शालेय शिक्षण घेतले. पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध विषयात एम.ए., एम.फिल. आणि पीएचडी पदवी मिळवली. शिक्षणात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.

UPSC परीक्षेसाठी बहुतांश विद्यार्थी कोचिंग क्लासेसला प्राधान्य देतात, पण प्रांजळने कोणताही क्लास न लावता, केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यास केला. त्यांनी खास सॉफ्टवेअरच्या मदतीने पुस्तकं ऐकून वाचन केलं आणि अभ्यास पूर्ण केला. प्रांजळने पहिल्यांदा 2016 मध्ये UPSC परीक्षा दिली आणि 744वी रँक मिळवली. पण ती रँक त्यांच्या समाधानासाठी पुरेशी नव्हती. त्यांनी पुढील वर्षी म्हणजेच 2017 मध्ये पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी 124वी रँक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

IPS अधिकारी बजरंग यादव: लहानपणीच हरपली वडिलांची छत्रछाया; घरातील धान्य विकून गोळा केली ट्युशन फी

2018 मध्ये प्रांजळ पाटील यांची नेमणूक केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. ही नेमणूक त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक अभिमानाचा आणि प्रेरणादायक क्षण ठरला. प्रांजळ यांची कहाणी हे सिद्ध करते की अपंगत्व किंवा कोणतीही मर्यादा तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, जर तुमच्याकडे आत्मविश्वास, चिकाटी आणि ध्येय गाठण्याची तळमळ असेल.

Web Title: Pranjal patil andh ias adhikari upsc marathi story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 01:15 AM

Topics:  

  • UPSC

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.