Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखाहून अधिक जणांना सरकारी नोकऱ्या देणार; फडणवीस यांची मोठी घोषणा!

राज्य सरकारकडून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एकूण 1 लाखाहून अधिक जणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहे. याशिवाय पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठीचा कायदा देखील याच अधिवेशनात करणार केला जाणार आहे. असे आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 01, 2024 | 07:13 PM
provide government jobs to more than 1 lakh people Fadnavis big announcement

provide government jobs to more than 1 lakh people Fadnavis big announcement

Follow Us
Follow Us:

राज्य सरकारद्वारे तब्बल 1 लाख 8 हजार नोकर भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 57 हजार 452 अर्जदारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय राज्यात पेपरफुटीचा कायदा देखील याच अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते आज विधानसभा सभागृहाला संबोधित करताना ते बोलत होते.

पारदर्शी पद्धतीने होणार परीक्षा

राज्यात ऑगस्ट 2022 पासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत तेव्हापासून सरकारने १ लाखांहून अधिक जणांना सरकारी नोकरी देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार आतापर्यंत अनेक पार घेण्यात आल्या. ज्या अतिशय पारदर्शी पद्धतीने पार पडल्या. अमरावतीत येथे घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला, तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. याशिवाय गट-क च्या रिक्त पदांची भरती ही यापुढे एमपीएससीमार्फत होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

77 हजार 305 जणांना दिलीये सरकारी नोकरी

दरम्यान, राज्य सरकारने आतापर्यंत ऑगस्ट 2022 पासून, 57 हजार 452 तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. या व्यतिरिक्त ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना या सव्वा महिन्यात किंवा महिन्याभरात नियुक्तीपत्र दिले जाईल, अशी संख्या 19 हजार 853 इतकी आहे. आमच्या सरकारने 75 हजार भरतीची घोषणा केली होती, त्याऐवजी आतापर्यंत 77 हजार 305 लोकांना सरकारी नोकरी दिली आहे. तसेच याबद्दलची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. तर काहींना दिले जात आहे. अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली आहे.

आणखी 31 हजार 201 पदे भरली जाणार

याशिवाय येत्या काळात नव्याने 31 हजार 201 पदे भरली जातील. त्यासाठीची प्रक्रिया ही पुढील तीन महिन्यात राबविली जाणार आहे. अर्थात राज्यातील शिंदे-भाजप सरकारच्या कार्यकाळात एकूण 1 लाख 8 हजार जणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. अडीच वर्षाच्या काळात एक लाख नवीन नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Provide government jobs to more than 1 lakh people fadnavis big announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 07:13 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • government jobs
  • mpsc jobs
  • talathi exam

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
2

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.