Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे कार्यरत असून, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचा पर्यायी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2026 | 11:38 AM
मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Follow Us
Follow Us:
  • मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ स्वतंत्रपणे सुरू राहणार
  • टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांचा पर्यायी प्रस्ताव
  • फडणवीसांनी मांडला नवा प्रस्ताव
Devendra Fadnavis: मुंबई आणि नवी मुंबई येथील विमानतळांच्या भविष्यातील कामकाजाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई विमानतळावरून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी भूमिका मांडली आहे. मुंबई विमानतळावरील कोणतेही उड्डाण नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत राहतील, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ चा पुनर्विकास करण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचा पर्यायी प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

टर्मिनल 1B उभारल्यानंतर 1A चा पुनर्विकास

मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावानुसार, सर्वप्रथम मुंबई विमानतळावर टर्मिनल 1B उभारण्यात यावे. त्यानंतर सध्या टर्मिनल 1A मधून सुरू असलेल्या विमानसेवा नव्या टर्मिनल 1B मध्ये स्थलांतरित कराव्यात. टर्मिनल 1A पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर ते पाडून त्या जागेवर नव्याने पुनर्विकास करावा, अशी योजना आहे. या पद्धतीमुळे विमानतळाचे नियमित कामकाज पूर्णपणे बंद न करता पुनर्विकास करणे शक्य होऊ शकते. तसेच प्रवाशांना होणारी गैरसोय टाळता येईल आणि विमान कंपन्यांनाही त्यांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागणार नाहीत.

MIAL चा १४ आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाणे हलवण्याचा प्रस्ताव

मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने यापूर्वी टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार मुंबईला १४ आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडणारी येणारी आणि जाणारी उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचे नियोजन होते.

यामध्ये बहरीन, दम्मम, ढाका, दोहा, फुजैराह, जकार्ता, जेद्दा, काठमांडू, कुवेत सिटी, मदिना, मस्कत, रास अल खैमाह, रियाध आणि शारजाह या शहरांचा समावेश होता. २०२७ च्या उन्हाळी विमान वेळापत्रकापासून या बदलांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव होता.

विमान कंपन्यांकडून प्रस्तावाला विरोध

MIAL च्या प्रस्तावाला अनेक विमान कंपन्यांनी विरोध दर्शवला होता. मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर उड्डाणे हलवल्यास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः मुंबई विमानतळावरून कनेक्टिंग फ्लाइट पकडणाऱ्या प्रवाशांना विमानतळ बदलण्यासाठी दोन्ही ठिकाणांदरम्यान प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढण्याची शक्यता होती.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या पर्यायी प्रस्तावामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत असून, अंतिम निर्णयाकडे विमान कंपन्यांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे स्वतंत्रपणे कार्यरत ठेवून मुंबई विमानतळाचा विस्तार कसा करायचा, याबाबत केंद्र सरकारचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार आहेत का?

    Ans: नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Que: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी काय प्रस्ताव आहे?

    Ans: प्रथम टर्मिनल 1B उभारण्यात येईल. त्यानंतर टर्मिनल 1A वरील उड्डाणे 1B मध्ये हलवून जुने टर्मिनल पाडून त्याचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे.

  • Que: MIAL ने यापूर्वी कोणता प्रस्ताव मांडला होता?

    Ans: MIAL ने मुंबई विमानतळावरून बहरीन, दोहा, जेद्दा, मस्कत, रियाधसह १४ आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव मांडला होता. 

Web Title: Mumbai airport flights not shifted to navi mumbai devendra fadnavis sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • airport
  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
1

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर
2

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
3

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
4

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.