Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

Pune pharma innovation hub: पुण्यातील फार्मसी महाविद्यालयांमधील संशोधन आता केवळ प्रयोगशाळा आणि रिसर्च पेपरपुरते मर्यादित न राहता उद्योजकतेपर्यंत आणि प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत पोहोचण्याची गरज आहे का? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 26, 2026 | 05:09 PM
pharma

pharma

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे.

pharma innovation hub : फार्मसी शिक्षणाबरोबरच औषधनिर्मिती, संशोधन, आरएनडी आणि क्लिनिकल रिसर्चचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुणे शहर विकसित झाले आहे. फार्मसी महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. त्यातून रिसर्च पेपर प्रसिद्ध होतात, पेटंट मिळतात. मात्र, या संशोधनाचे पुढे काय होते, हा प्रश्न फार्मसी दिनानिमित्त उपस्थित होत आहे.

अनेक संशोधनांचे निष्कर्ष चांगले असतानाही ते प्रयोगशाळेच्या पलीकडे जात नाहीत. प्रोटोटाइप, तंत्रज्ञान हस्तांतरण, औद्योगिक सहकार्य, स्केल-अप, नियामक मान्यता आणि व्यावसायिकीकरण या पुढील टप्प्यांमध्ये संशोधन अडकते. त्यामुळे ‘पब्लिश मोअर’बरोबरच ‘ट्रान्सलेट मोअर’ आणि ‘कमर्शियलाइजेशन मोअर’वर भर देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. फार्मसी महाविद्यालये, फार्मा कंपन्या, सीआरओ, रुग्णालये, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांना एका एकात्मिक इनोव्हेशन इकोसिस्टममध्ये जोडण्याची आवश्यकता आहे. संशोधन प्रकल्प हे उद्योग आणि रुग्णांच्या प्रत्यक्ष समस्यांशी जोडल्यास त्यातून उपयुक्त तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित होऊ शकतात.

संशोधनासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता

पुणे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये संशोधन आणि शिक्षण यांची सांगड घालण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकाशने आणि पेटंट्स आहेत. महाविद्यालयांमध्ये औद्योगिक कन्सल्टन्सी प्रकल्पही सुरू आहेत. मात्र, नव्याने सुरू झालेल्या काही महाविद्यालयांमध्ये संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याने शासनानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

संशोधनाचे मूल्यमापन करण्याची गरज

संशोधनाचे मूल्यमापन केवळ किती पेपर प्रसिद्ध झाले किंवा किती पेटंट मिळाले, यावर न करता किती प्रोटोटाइप तयार झाले, किती तंत्रज्ञान उद्योगाकडे हस्तांतरित झाले, किती स्टार्टअप्स निर्माण झाले आणि किती उत्पादने बाजारात आली, यावरही करण्याची गरज आहे.

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

पुण्यात फार्मसी शिक्षणासोबत संशोधनाची मोठी क्षमता आहे. मात्र, संशोधनातून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा प्रवास अधिक मजबूत करण्याची गरज आहे. अकॅडमी, इंडस्ट्री, रुग्णालये, सीआरओ आणि गुंतवणूकदार यांना जोडणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. पेटंटपासून प्रोटोटाइप आणि उत्पादनापर्यंत संशोधन नेल्यास त्याचा रुग्णांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसरचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल अडकर/पाटील यांनी केले.

फार्मसी क्षेत्रात संशोधन आणि प्रकाशनांची संख्या वाढत आहे. पुणे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन प्रकाशने आणि पेटंट्स आहेत. आता पुढील टप्प्यात संशोधनाचा औद्योगिक उपयोग वाढविणे आवश्यक आहे. नव्या महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा आणि संशोधनक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने निधी आणि प्रभावी धोरणात्मक मदत उपलब्ध करून द्यावी, असे वक्तव्य भारती विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार यांनी केले.

सध्याचे महाविद्यालयीन संशोधन विविध मानांकन आणि पदोन्नतीच्या निकषांमुळे रिसर्च पेपरकडे अधिक झुकलेले आहे. मात्र, समाज आणि औषध उद्योगाला प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या इनोव्हेशनची गरज आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे मूल्यांकन केवळ प्रकाशनांवर न करता प्रत्यक्ष संशोधन, इनोव्हेशन आणि त्याचा समाजाला होणारा उपयोग यावरही झाले पाहिजे, असे डॉ. राहुल पाडळकर म्हणाले.

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

संशोधनातून उत्पादननिर्मितीची दिशा गरजेची

फार्मसी शिक्षणात कौशल्य, संशोधनात समस्यांचे समाधान आणि पेटंटमध्ये उत्पादननिर्मितीची दिशा निर्माण झाल्यास पुणे केवळ फार्मसी एज्युकेशन हब न राहता फार्मा इनोव्हेशन आणि कमर्शियलायझेशन हब म्हणून पुढे येऊ शकते. संशोधनाचे अंतिम यश हे केवळ सायटेशनमध्ये नसून, त्यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा रुग्ण आणि समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळण्यात आहे. असे तज्ज्ञांकडून मत व्यक्त जात आहे.

Web Title: Pune pharma innovation hub research commercialization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • education
  • Pharma

संबंधित बातम्या

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
1

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
2

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
3

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
4

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.