फोटो सौजन्य- iStock
पंजाब अँड सिंध बॅंकने अप्रेंटिसशिप 100 जांगासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बॅंकेचे अधिकृत संकेतस्थळ punjabandsindbank.co.in वर अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी त्वरीत अर्ज करावा. अर्जदाराचे वय हे 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हा पदवीधर असावा.
भरती आणि अधिकृत अधिसूचना
पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 ची जाहिरात punjabandsindbank.co.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचना असलेल्या PDF मध्ये यासंबंधीचे पात्रता निकष, निवड प्रक्रिया, पगार तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि बरेच काही समाविष्ट आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
पंजाब अँड सिंध बँक अपरेंटिस रिक्त जागा
या भरतीसाठी एकूण 100 रिक्त पदे जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील ३० जागा या दिल्ली शाखांसाठी आहेत, तर ७० जागा पंजाब शाखांसाठी आहेत.
पंजाब अँड सिंध बँक अपरेंटिस भरती 2024 पात्रता
वयोमर्यादा: पात्र उमेदवारासाठी किमान वय 20 वर्षे आहे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित केले आहे. याकिरता अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता प्राप्त केलेली असावी.
पंजाब अँड सिंध बँक अपरेंटिस भरती अर्ज प्रक्रिया
भरतीची अधिकृत अधिसूचना लिंक- https://punjabandsindbank.co.in/system/uploads/recruitment/2150_2024101518143414188.pdf