Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी पात्र उमेदवारांसाठी रेल्वेत जागा रिक्त! आजच करा अर्ज आणि मिळवा नियुक्ती

भारतीय रेल्वेत आरआरबी ग्रुप ‘डी’ भरती २०२६ अंतर्गत लेव्हल-१ च्या सुमारे २२ हजार पदांसाठी भरती होणार असून डिसेंबर २०२५ च्या चौथ्या आठवड्यात अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 20, 2025 | 07:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेत आरआरबी ग्रुप ‘डी’ भरती २०२६ अंतर्गत लेव्हल-१ च्या तब्बल २२ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात केंद्रीय रोजगार अधिसूचना (CEN) जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही अधिसूचना डिसेंबर २०२५ च्या चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

‘या’ तारखेला होणार Mumbai University चा दीक्षांत समारंभ; दीड लाखाहून अधिक स्नातकांना पदव्या

रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) ही भरती देशभरातील विविध झोनल रेल्वे आणि उत्पादन युनिट्ससाठी राबवली जाणार आहे. एचआरएमएस इंडेंट मॅनेजमेंट प्रणालीद्वारे पदांची गरज निश्चित करून रेल्वे बोर्डाने या २२ हजार जागांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेतील ग्रुप ‘डी’ भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

या भरतीत ट्रॅक मेंटेनर ग्रेड–IV पदांसाठी सर्वाधिक म्हणजेच ११ हजार पदे रिक्त आहेत. याशिवाय असिस्टंट (ट्रॅक मशीन) ६००, असिस्टंट (ब्रिज)  ६००, असिस्टंट (पी-वे) ३००, असिस्टंट (टीआरडी) ८००, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) २००, असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल)  ५००, असिस्टंट (टीएल अँड एसी) ५००, असिस्टंट (सी अँड डब्ल्यू) १,०००, पॉईंट्समन-बी ५,००० तसेच असिस्टंट (एस अँड टी) १,५०० पदांचा समावेश आहे. पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय साधारणतः १८ ते ३६ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत उमेदवार दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित पदासाठी आवश्यक वैद्यकीय निकष पूर्ण करणेही बंधनकारक राहणार आहे.

NCERT भरतीला सुरुवात! १७३ पदांसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज

निवड प्रक्रिया मुख्यत्वे संगणक आधारित लेखी परीक्षा (CBT), त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांद्वारे पूर्ण केली जाणार आहे. लेखी परीक्षेत सामान्य विज्ञान, गणित, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तसेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न विचारले जाणार असून, परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. आरआरबी ग्रुप ‘डी’ भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित प्रादेशिक आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. स्पर्धा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वेतील स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्यासाठी ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

Web Title: Railway vacancies available for candidates with a 10th grade qualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:56 PM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

Train Ticket Rule : रेल्वेच्या नियमात मोठा बदल! तिकीट रिझर्व्हेशनबाबत महत्त्वाचा निर्णय
1

Train Ticket Rule : रेल्वेच्या नियमात मोठा बदल! तिकीट रिझर्व्हेशनबाबत महत्त्वाचा निर्णय

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?
2

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.