Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Delhi Railway Project: रेल्वे कनेक्टिव्हिटीला ‘गति शक्ती’! १८,५०९ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

देशातील वाहतूक खर्च कमी होईल, २२० दशलक्ष लिटर तेल आयात वाचेल आणि १.११ अब्ज किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल, जे ४ कोटी झाडे लावण्याइतके आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 16, 2026 | 04:08 PM
Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? (फोटो सौजन्य-Gemini)

Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • १८,५०९ कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
  • दळणवळण आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा
  • पर्यावरणपूरक आणि आर्थिक फायदा
New Delhi Railway Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे १८,५०९ कोटी किमतीच्या तीन प्रमुख प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमध्ये कसारा-मनमाड (महाराष्ट्र), दिल्ली-अंबाला (दिल्ली आणि हरयाणा) आणि बल्लारी-होसापेठ (कर्नाटक) दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे. सरकारने शनिवारी सांगितले की, या प्रकल्पांमुळे रेल्वेची क्षमता वाढेल. वाहतूक प्रवाहात लक्षणीय सुधारणा होईल. यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता वाढेल. हे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प कामकाज सुलभ करतील आणि गर्दी कमी करतील, हे प्रकल्प पंतप्रधानांच्या ‘नवीन भारत’ च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून प्रदेशातील लोकांच्या स्वावलंबीतेला हातभार लावतील.

‘… नवीन ट्रेंड समोर येतोय’; Assam CM विरुद्ध याचिका; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

वाहतूक कार्यक्षमता वाढविण्यास मदत

प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार केलेले हे प्रकल्प एकात्मिक नियोजन आणि भागधारकांच्या सल्ल्याद्वारे कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतील. या उपक्रमामुळे लोक, वस्तू आणि सेवांची अखंड वाहतूक सुनिश्चित होईल, दिल्ली, हरयाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांमध्ये पसरलेले हे प्रकल्प विद्यमान रेल्वे नेटवर्क अंदाजे ३८९ किलोमीटरने वाढवतील, प्रस्तावित मल्टी-ट्रैकिंग प्रकल्पांमुळे अंदाजे ९७ लाख लोकसंख्या असलेल्या अंदाजे ३,९०२ गावांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. याव्यतिरिक्त, हे प्रकल्प देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांशी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारतील. यामध्ये भावली धरण, घाटंडेवी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, कटरा (माता वैष्णो देवी), श्रीनगर, हंपी, बल्लारी किल्ला, दारोजी स्लॉथ बेअर अभयारण्य, तुंगभद्र धरण, केंचनगुड्ढा आणि विजय विठ्ठल मंदिर यांचा समावेश आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train चे तिकीट किती? वेगवान प्रवास कधीपासून? रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

रेल्वे ही पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीची पद्धत आहे. या प्रकल्पांमुळे हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होईल, देशातील वाहतूक खर्च कमी होईल, २२० दशलक्ष लिटर तेल आयात वाचेल आणि १.११ अब्ज किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल, जे ४ कोटी झाडे लावण्याइतके आहे.

१८,५०९ वाहतूक कार्यक्षमता सुधारणा

३८९ किलोमीटरने रेल्वे नेटवर्कचा विस्तार

राज्यांना महाराष्ट्र, ०४ दिल्ली, हरयाणा आणि कर्नाटक फायदा होईल.

३,९०२ गावांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल मल्टी-ट्रॅकिंगमुळ

१२ जिल्ह्यांचा समावेश असेल या प्रकल्पांमध्ये

९७ लाख लोकांना फायदा होईल.

२२ कोटी लिटर तेल आयात बचत होईल

१११ कोटी किलोग्रॅम -कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल, जे अंदाजे ४ कोटी झाडे लावण्याइतकेच आहे.

ब्रहुमपुत्रेखाली भारतातील पहिल्या बोगद्याला मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाने गोहपूर आणि नुमालीगड दरम्यान वार पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर बाधण्यास मान्यता दिली आहे, ज्यामध्ये आसाममधील ब्रह्मपुत्रेखाली भारतातील पहिला रस्ता-कम-रेल्वे बोगदा समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी सरकारने १८.६६२ कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिली.

 

Web Title: Central government approves railway projects worth 18509 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
1

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
2

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
4

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.