स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा 'हे' सोपे भाषण
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळेल. जगाचा इतिहासात १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये कोरण्यात आला होता. याच दिवशी भारत ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. त्यामुळे १९४७ पासून सगळीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी शाळा, सरकारी कार्यलय आणि इतर अनेक ठिकाणी ध्व्ज रोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच शाळेमध्ये भाषण स्पर्धा किंवा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. भाषण स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नेमकं काय बोलावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ ऑगस्टला भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहोत. या मुद्यांना अनुसरून भाषण केल्यास शाळेत सगळेच तुमचे कौतुक करतील.(फोटो सौजन्य – istock)
Independence day Quiz: स्वातंत्र्यदिनाविषयी १० प्रश्न, तुम्हाला किती उत्तरे माहिती?
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि येथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथी आणि माझ्या प्रिय मित्रांनो… सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या आनंदात मग्न आहे. मित्रांनो, १५ ऑगस्ट हा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात खूप महत्वाचा आहे. १५ ऑगस्ट हाच तो दिवस आहे जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीपासून मुक्ती मिळाली. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे हा दिवस त्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी, समाजसेवकांनी तसेच क्रांतीकारकांनी आयुष्य वाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय, अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी कृपलानी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, रासबिहारी बोस, गोपाळ कृष्ण गोखले, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, केशवचंद्र सेन, अरविंद घोष, वासुदेव बळवंतरराव फडके, क्रांतीसिंह नाना पाटील, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दिन तयैबजी, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास अशांचा उल्लेख केला जातो. ही यादी संपणार नाही कारण अशा नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले.दुसरीकडे बंकिम चन्द्र चटर्जी यांनी लिहलेले ‘वंदे मातरम’ हे प्रत्येकामध्ये स्फुरण चढवत होते. या गीताचे स्थान ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीचे आहे. हे गाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा देणारे होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक क्रांतीकारकांच्या तोंडावर हे गीत होते.
वंदे मातरम्, वंदे मातरम्!
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!