Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI मध्ये भरती! ९० पेक्षा जास्त तरुणांना देणार नोकरी, आताच करा अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेटा सायन्स, आयटी, सायबर सिक्युरिटी व बँकिंग क्षेत्रातील ग्रेड C, D आणि E स्तरावरील एकूण ९३ पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 07:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे
  • एकूण ९३ पदांवर ही भरती केली जाणार
  • अंतिम तारीख ६ जानेवारी २०२६ असून
देशातील मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने तरुणांसाठी मोठी रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयकडून डेटा सायन्स, आयटी, सायबर सिक्युरिटी तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ग्रेड C, D आणि E स्तरावरील एकूण ९३ पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ६ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Mumbai University: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात ‘बोलींचा जागर’; लुप्तप्राय बोलींना नवतंत्रज्ञानाची जोड

कुठे आणि कसा करायचा अर्ज?

या भरतीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकृत संधी पोर्टल opportunities.rbi.org.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ‘Current Vacancies’ विभागात जाऊन Lateral Recruitment संदर्भातील जाहिरात निवडावी. त्यानंतर संबंधित पदावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज लिंक उघडावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉगइन करून अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप आणि ई-पावती डाउनलोड करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येईल, मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे.

पदांचा तपशील

या भरतीअंतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ पदांचा समावेश आहे. त्यामध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट, नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, AI/ML स्पेशालिस्ट, रिस्क अ‍ॅनालिस्ट, अकाउंट स्पेशालिस्ट, पॉलिसी रिसर्च अ‍ॅनालिस्ट, बँकिंग डोमेन स्पेशालिस्ट, क्रेडिट रिस्क व लिक्विडिटी रिस्क तज्ज्ञ अशा अनेक पदांचा समावेश आहे. एकूण ९३ पदांवर ही भरती केली जाणार आहे.

ऑनलाइन नोंदणी व अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२६ असून, त्या दिवशी सायंकाळी ६ वाजता अर्ज प्रक्रिया बंद होईल. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असली तरी साधारणपणे उमेदवारांचे वय २५ ते ४० वर्षांदरम्यान असावे. काही वरिष्ठ पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षांपर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

या भरतीमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्जांची प्राथमिक छाननी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत प्रक्रिया राबवली जाईल. उमेदवाराची पात्रता, अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरी यांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फुल-टाईम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाणार आहे.

SBI SO पदासाठी करा अर्ज; जानेवारीच्या ५ तारखेपर्यंत मुदत, वाचा सविस्तर माहिती

डेटा, आयटी, सायबर सिक्युरिटी किंवा बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयची ही भरती मोठी संधी मानली जात असून, इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Recruitment at rbi over 90 young people will be given jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Bank
  • RBI

संबंधित बातम्या

India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेचा ‘गोल्डीलॉक्स’ कालावधी, ऑक्टोबरमध्ये ८.२% ची जीडीपी वाढ
1

India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेचा ‘गोल्डीलॉक्स’ कालावधी, ऑक्टोबरमध्ये ८.२% ची जीडीपी वाढ

RBI Repo Rate 2026: RBI घेणार फेब्रुवारीत रेपो दर कपात निर्णय? UBI अहवालात संकेत
2

RBI Repo Rate 2026: RBI घेणार फेब्रुवारीत रेपो दर कपात निर्णय? UBI अहवालात संकेत

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम
3

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

RBI ची मोठी कारवाई! ‘या’ दिग्गज प्रायव्हेट बँकेला ठोठावला 62 लाख रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम
4

RBI ची मोठी कारवाई! ‘या’ दिग्गज प्रायव्हेट बँकेला ठोठावला 62 लाख रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.