फोटो सौजन्य - Social Media
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) भरतीसंदर्भात उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. एसओ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना आता वाढीव मुदतीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करता येणार असून, नव्या सूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेतून एसबीआयमध्ये एकूण ९९६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना बँकेने २ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केली होती. ही भरती विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसाठी होत असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील विशेष ज्ञान व अनुभवही आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास, स्पेशलिस्ट ऑफिसर कॅटेगरीतील मॅनेजर-स्तरावरील पदांसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ४२ वर्षे असावे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
एसबीआय एसओ निवड प्रक्रिया २०२५ ही प्रामुख्याने मुलाखतीवर आधारित असेल. ही मुलाखत प्रत्यक्ष, दूरध्वनी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. मुलाखत एकूण १०० गुणांची असेल. मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची पुढे दस्तऐवज पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या कामगिरीनुसार आणि पात्रतेनुसार अंतिम निवड केली जाईल.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा






