Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरती! पूणेकरांनो… संधीचा फायदा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांच्या 52 पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2025 असून निवड झालेल्यांना ₹40,000 मानधन दिले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 07, 2025 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपात होणार असून इच्छुक उमेदवारांनी 4 सप्टेंबर 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.

IOCL मध्ये भरती! नोकरीच्या शोधात आहात? मग वाट कसली पाहताय? करा अर्ज

एकूण पदांची संख्या

या भरती प्रक्रियेत एकूण 52 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या गटासाठी 33, महिलांसाठी 17 आणि क्रीडा आरक्षणाखाली 2 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

मानधन व नियुक्ती कालावधी

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹40,000 इतके एकत्रित मानधन दिले जाईल. ही नियुक्ती 31 मे 2026 पर्यंत वैध असेल. म्हणजेच उमेदवारांना जवळपास नऊ महिन्यांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. कंत्राटी स्वरूपात असली तरी ही नोकरी उमेदवारांच्या शैक्षणिक अनुभवात मोलाची भर घालणार आहे.

कोणत्या विभागांत पदे उपलब्ध?

विद्यापीठाने ज्या विभागांत सहाय्यक प्राध्यापकांची मागणी केली आहे त्यात:

  • जैवतंत्रज्ञान
  • ऊर्जा अभ्यास
  • रसायनशास्त्र
  • संगणकशास्त्र
  • आरोग्यशास्त्र
  • इलेक्ट्रॉनिक्स व उपकरणशास्त्र
  • गणित
  • सूक्ष्मजीवशास्त्र
  • मानवशास्त्र

या नऊ विभागांमध्ये पात्र उमेदवारांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

भरतीची पार्श्वभूमी

यापूर्वी जून 2025 मध्ये विद्यापीठाने एकूण 133 पदांसाठी भरतीची जाहिरात केली होती. त्यापैकी 86 नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप शासनमान्य 111 कायमस्वरूपी पदे प्रलंबित असल्याने विद्यापीठाने सध्या कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला विद्यार्थ्यांच्या कृती संघर्ष समितीने आक्षेप घेतला होता. जुन्या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आता नव्याने 52 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

४३४ पदांसाठी भरती! RRB ने केले आयोजन; विलंब न करता करा अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील नामांकित व प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र मानले जाते. अशा संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी उमेदवारांसाठी करिअरमध्ये महत्वाची ठरू शकते. मानधन आणि नियुक्तीचा कालावधी निश्चित असला तरी शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी ही भरती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेपूर्वी अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

Web Title: Recruitment at savitribai phule university pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Environment Special Story: ‘इकोकारी’चा पर्यावरणपूरक प्रवास, वेस्ट पासून बेस्टकडे!
1

Environment Special Story: ‘इकोकारी’चा पर्यावरणपूरक प्रवास, वेस्ट पासून बेस्टकडे!

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील ‘या’ ठिकाणी उलगडले जाणार…
2

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील ‘या’ ठिकाणी उलगडले जाणार…

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…
3

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण
4

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.