फोटो सौजन्य - Social Media
मुंबई महानगरपालिकेमध्ये एका महत्वाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR) च्या पदासाठी या भरतीला आरंभ करण्यात आला आहे. तसेच या भरतीबाबत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. ही संधी वकिली क्षेत्रातील उमेदवारांसाठी असल्याने काही मानदंडाना पात्र उमेदवार या भरतीच्या संधीत आपले स्थान निश्चित करू शकतो. हे मानदंड तसेच अटी शर्ती अधिसूचनेत जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भात सखोल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावयाचे आहे.
हे देखील वाचा : अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारांसाठी भरतीची सुवर्णसंधी; HURL मध्ये अर्ज प्रक्रियेला सुरुवात
मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरु करण्यात आलेल्या या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड पदाच्या एकूण २५ रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. नोकरीचे ठिकाण अर्थातच मुंबई आहे. मुंबई मध्ये वकिली क्षेत्रामध्ये कामाच्या सांध्यांच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीने या भरतीचा जरूर लाभ घ्यावा. परंतु, महत्वाची गोष्ट अशी आहे कि, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करू पाहणारे उमेदवाराकडे किमान १० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची निदान ५ वर्षासाठी AOR म्हणून नोंदणी असावी.
उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. अर्ज एका ठराविक पत्त्यावर पाठवायचे आहे. कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा माळा, बृहन्मुंबई महानगरपालिका, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१. या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहे. या संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेचा अभ्यास करता अर्ज करण्यास येणारे अडथळे टाळता येतील. mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायचे आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात किमान १५ प्रकरणे हातळले असणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाही.