Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DU मध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

दिल्ली विद्यापीठाच्या चार प्रमुख महाविद्यालयांमध्ये लायब्रेरियन, ज्युनियर असिस्टंट, ड्रायव्हर आणि MTS पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी dunt.uod.ac.in ला भेट द्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2025 | 07:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विद्यापीठाच्या (DU) महाविद्यालयांमध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला दिल्ली विद्यापीठाच्या प्रमुख महाविद्यालयांमध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत लायब्रेरियन, ज्युनियर असिस्टंट, ड्रायव्हर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ठरलेल्या अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा. ही भरती जीसस अँड मेरी कॉलेज, दीन दयाल उपाध्याय कॉलेज, श्याम लाल कॉलेज आणि अदिती महाविद्यालय यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख प्रत्येक महाविद्यालयासाठी वेगळी आहे. जीसस अँड मेरी कॉलेजसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे, दीन दयाल उपाध्याय कॉलेजसाठी १२ मार्च २०२५, श्याम लाल कॉलेजसाठी १४ मार्च २०२५ आणि अदिती महाविद्यालयासाठी १७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

HSC Borad : 12 वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर; शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीन तेरा

या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल टेस्ट (कौशल्य चाचणी), मुलाखत आणि शैक्षणिक पात्रता याच्या आधारे केली जाईल. प्रथम उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल, त्यानंतर पदानुसार आवश्यक कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल आणि शेवटी शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांनुसार अंतिम निवड केली जाईल.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी DU च्या अधिकृत वेबसाइट dunt.uod.ac.in वर जावे आणि तिथे संबंधित महाविद्यालयाच्या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. अर्ज भरण्याआधी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचा आणि योग्य तपशील भरा. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. अर्ज फी ऑनलाइन भरल्यानंतर अंतिम सबमिशन करावे आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवावी.

‘तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण…” महिला दिन भाषण; नक्की वाचा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यासाठी सज्ज असावे. अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी दिल्ली विद्यापीठाच्या किंवा संबंधित महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सरकारी नोकरीसाठी ही संधी लाभदायक ठरू शकते, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Web Title: Recruitment for non teaching posts in du

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

‘International’ ‘Global’ शब्द वापरून पालकांची दिशाभूल? शाळांच्या नावावरून शासनाचे नवे नियम
1

‘International’ ‘Global’ शब्द वापरून पालकांची दिशाभूल? शाळांच्या नावावरून शासनाचे नवे नियम

शिक्षक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीत सुधारणा! नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आले बदल
2

शिक्षक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीत सुधारणा! नेमक्या कोणत्या उद्देशाने करण्यात आले बदल

Jobs Alert! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी Special Recruitment
3

Jobs Alert! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी Special Recruitment

‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी! सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी
4

‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी! सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.