फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने भरतीला सुरुवात केली आहे. अप्रेन्टिस पदासाठी या भरतीला सुरु करण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून १,७७० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.अर्ज ३ मे पासून स्वीकारण्यात येणार असून २ जून पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
IOCL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास काही शैक्षणिक अटींना पात्र करावे लागणार आहे. मुळात, अर्ज कर्ता उमेदवार ITI/ Diploma/ Degree in Related Trade या शिक्षणासंबंधित अटींना पात्र असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी किमान आयु १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर कमाल आयु २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित उमेदवारांना शासकीय नियमांनुसार अटी लागू करण्यात आल्या आहेत.
निवड प्रक्रियेमध्ये एकूण तीन टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वप्रथम, उमेदवारांची पात्रता आणि शैक्षणिक अहवालांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. ही शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जाणार असून पात्र उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. या टप्प्यात उमेदवारांनी सर्व आवश्यक दस्तऐवजांची मूळ प्रत व झेरॉक्स घेऊन हजर राहणे बंधनकारक आहे. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात, वैद्यकीय तपासणी करण्यात येईल ज्यामध्ये उमेदवारांचे आरोग्य निकष तपासले जातील. ही तपासणी उमेदवारांची शारीरिक व मानसिक क्षमता तपासण्यासाठी महत्त्वाची असते. याशिवाय, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. हा अर्ज पूर्णपणे मोफत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज भरावा व संधीचा फायदा घ्यावा.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: