फोटो सौजन्य - Social Media
इंडियन स्पेस रिसर्च सेंटर (ISRO)ने भरतीच्या नवीन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना Scientist/Engineer पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ६३ जागा रिक्त आहेत आणि त्या भरण्यात येणार आहेत. या भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना त्या वाचता येणार आहेत. अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचावा.
ISRO ने या भरतीसाठी काही अटीशर्ती जाहीर केल्या आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संबंधित आहेत. या अटी शर्ती पात्र करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहेत. सगळ्यात आकर्षक बाब म्हणजे आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीच्या माध्यमातून काही प्रमाणात शासनाच्या नियंमांनुसार सूट देण्यात येणार आहे.
मुळात, Scientist/Engineer (Electronics) पदासाठी २२ जागा रिक्त आहेत. तसेच या पदासाठी शैक्षणिक अट GATE Score Card + Degree in Related Field with 65% Marks निश्चित करण्यात आली आहे. Scientist/Engineer (Mechanical) पदासाठी ३३ जागा रिक्त आहेत. तसेच या पदासाठी शैक्षणिक अट GATE Score Card + Degree in Related Field with 65% Marks निश्चित करण्यात आली आहे. तसेच Scientist/Engineer (Computer Science) पदासाठी ०८ जागा रिक्त आहेत. शैक्षणिक अट GATE Score Card + Degree in Related Field with 65% Marks मंजूर करण्यात आली आहे.
ISRO एकूण ४ टप्प्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये उमेदवाराला शॉर्टलिस्ट केले जाईल. यांनतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दस्तऐवजांच्या पडताळणीसह उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० भरावे लागणार आहेत. तर ओबीसी/EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम म्हणजे २५० रुपये भरावे लागणार आहेत. SC/ST/PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठीही अर्ज शुल्काची रक्कम २५० रुपये ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचावी.