फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खास बातमी आहे. आंध्र प्रदेश लोक सेवा आयोगाने या भरतीला सुरुवात केली आहे. फॉरेस्ट बीट ऑफिसर पदासाठी आणि असिस्टंट बीट ऑफिसर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. एकूण ६९१ पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती १६ जुलैपासून आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांना psc.ap.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
फॉरेस्ट बीट ऑफिसर पदासाठी येथे २५६ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. तसेच असिस्टंट बीट ऑफिसर पदासाठी एकूण ४३५ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही पदांसाठी शैक्षणिक निकष वेगवेगळे आहेत. ते जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क करायचे आहे. उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तसेच ८० रुपये परीक्षा शुल्क भरायचे आहे. SC, ST तसेच एक्स सर्व्हिसमेन यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: