Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज! किती कर्जाची आवश्यकता आहे? फुल ऑन गॅरंटी

मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेणे खर्चिक असले तरी शैक्षणिक कर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. भारतामधील अनेक बँका कमी व्याजदरात परदेशी शिक्षणासाठी कर्ज देतात, मात्र कर्ज घेण्यापूर्वी अटी समजून घेणे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 05:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेणे हे स्वप्न असते, मात्र वाढते शिक्षण शुल्क आणि राहणीमानाचा खर्च पाहता ते मोठे आर्थिक आव्हान ठरते. अशा परिस्थितीत शैक्षणिक कर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. भारतातील अनेक सरकारी व खासगी बँका परदेशी शिक्षणासाठी तुलनेने कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज देतात. मात्र कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.

UGC NET Result 2025: लाखो उमेदवारांची प्रतीक्षा संपणार; निकाल लवकरच होणार जाहीर

कर्जाची हमी (थर्ड पार्टी गॅरंटी)

बहुतेक बँका चार लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज कोणत्याही हमीदाराशिवाय देतात. मात्र जर कर्जाची रक्कम ७.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँकेकडे मालमत्ता, विमा पॉलिसी किंवा बँक ठेव (FD) यासारखी तारण द्यावी लागते. त्यामुळे मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे असल्यास आधीच कर्ज हमीदार किंवा तारणाची व्यवस्था करून ठेवणे आवश्यक ठरते.

किती कर्जाची आवश्यकता आहे?

कर्ज घेण्यापूर्वी नेमकी किती रक्कम लागणार आहे, याचा अंदाज बांधणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये केवळ कॉलेज किंवा विद्यापीठाचे शुल्क नव्हे, तर वसतिगृह, राहणीमान, प्रवास खर्च, पुस्तके, लॅपटॉप, विमा आणि इतर लहान-मोठे खर्चही समाविष्ट करावेत. फक्त कॉलेजच्या फीवर आधारित कर्ज घेणे टाळावे, कारण परदेशात इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

कर्जाची परतफेड आणि मोरेटोरियम कालावधी

बहुतेक बँका अभ्यास कालावधीत आणि त्यानंतर एक वर्षाचा मोरेटोरियम कालावधी देतात. या कालावधीत कर्जाची मूळ रक्कम परतफेड करावी लागत नाही. मात्र लक्षात घ्यावे की, कर्ज मंजूर झाल्याच्या दिवसापासून व्याज आकारले जाते. मोरेटोरियम कालावधी संपल्यानंतर साधारणपणे १० ते १५ वर्षांच्या आत कर्जाची परतफेड करता येते.

शैक्षणिक रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर

शैक्षणिक कर्जासाठी तुमचा शैक्षणिक रेकॉर्ड आणि सह-हमीदाराचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. तसेच विविध बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासक्रम, विद्यापीठाची मान्यता आणि भविष्यातील नोकरीच्या संधी यावरही व्याजदर अवलंबून असतो.

कर्ज घेणे फायदेशीर ठरेल का?

शैक्षणिक कर्जामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येते. परतफेडीसाठी निश्चित कालावधी मिळत असल्याने आर्थिक नियोजन करता येते. मात्र त्याच वेळी शिष्यवृत्ती, फेलोशिप किंवा पूर्ण निधी असलेल्या योजनांसाठीही अर्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्जाचा बोजा कमी होईल.

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

योग्य नियोजन आवश्यक

जर स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर किंवा शिष्यवृत्तीच्या आधारे शिक्षण पूर्ण करता येत असेल, तर अनावश्यक कर्ज घेणे टाळावे. कर्जाचा मानसिक आणि आर्थिक ताण भविष्यात जाणवू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे, तुलना करणे आणि योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Educational loans for studying abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.