Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chh. Sambhaji Nagar : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन!

पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 10:22 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घकाळ शाळेशी जुळलेल्या नात्याला निरोप देताना अनेक विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र या समारंभात पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागत गीताने झाली. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप सपकाळ होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे, तसेच जितेंद्र पाडवे हे प्रमुख उपस्थित होते.

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

या प्रसंगी महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वकृत्व स्पर्धा, तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. निरोप समारंभात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण आणि शाळेतील अनुभव यांची आठवण काढताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. या आठवणींच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. नृत्य, गीत व इतर सादरीकरणांनी वातावरण आनंदी झाले. यावेळी प्रा. योगेश निंभोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा सल्ला देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर जितेंद्र पाडवे यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, वेळेचे योग्य नियोजन तसेच मोबाईल व तंत्रज्ञानाचा सदुपयोग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात दिलीप सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना सत्य, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. “सातत्यपूर्ण अभ्यास आणि परिश्रमाची साथ असल्यास यश निश्चित मिळते,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री चापे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप जाधव, प्रदीप चिकाटी, कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, राजेश ठोंबरे, सुनील सागरे, भास्कर केरले, महादेवी ठवरे, प्रफुल कळम, विकी चांदुरकर, गजानन सपकाळ, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, अक्षय निकम यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: A touching farewell ceremony was organized for the 10th and 12th grade students at sahakar maharshi manikrao palodkar vidyalaya in palod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
1

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
2

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.