फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच AIMS! AIMS ने नुकतेच एक महत्वाच्या भरटीओ प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तसेच या संबंधित जाहिरातही जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी अनुभवी मंडळींना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी AIIMS गुवाहाटीच्या aiimsguwahati.ac.in या संकेतस्थळावर जावे लागेल तसेच अर्ज करता येईल.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही निकष पात्र करावे लागणार आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या आयु संबंधित आहेत. MBBS, एमएस/एमडी, एम.सीएच, डीएम पदवी असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त ५८ वर्ष आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुळात, ही भरती अनुभवी तज्ञांसाठी आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा रु. १,०१,५०० – रु. १,६८,९०० इतका पगार मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही अर्ज करू इच्छित आहात तर लक्षात असू द्या की अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अनारक्षित, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १५०० रुपये भरायचे आहे. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ ठेवण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुख्यतः बायोडेटाच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यानंतर स्क्रीनिंग चाचण्या घेतल्या जातील. यशस्वी उमेदवारांची मुलाखत होईल आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट [aiimsguwahati.ac.in](https://aiimsguwahati.ac.in) ला भेट द्यावी. तिथे “Apply” किंवा “लागू करा” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक अर्ज फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि लागणारी कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तो दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची ही प्रक्रिया काळजीपूर्वक आणि वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.