फोटो सौजन्य - Social Media
गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 455 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून उमेदवारांना 28 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क श्रेणीवार ठरवण्यात आले आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी शुल्क 650 रुपये आहे, तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करताना शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स तसेच किमान 1 वर्षाचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
निवड प्रक्रियेत उमेदवारांना सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर चालक परिक्षा (Driving Test) होईल. हे दोन्ही टप्पे पार केलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व त्यानंतर वैद्यकीय तपासणी (Medical Test)साठी बोलावण्यात येईल. सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड होईल. जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे, हे आधी लक्षात घ्या.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा पद्धत याबाबत सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही संधी देशसेवा करण्यासोबतच केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत स्थिर व सुरक्षित नोकरी मिळवून देते. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा.