फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) तर्फे ऑफिसर ग्रेड बी पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी रोजगार समाचार पत्रात संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर सायं. 6 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्ज RBI च्या अधिकृत संकेतस्थळावर opportunities.rbi.org.in येथे करता येतील.
या भरती मोहिमेद्वारे RBI मध्ये एकूण 120 पदे भरली जाणार असून उमेदवारांची नियुक्ती तीन विभागांमध्ये केली जाईल. जनरल, DISM (Statistics/Mathematics), DEPR (Economics/Finance). देशातील प्रतिष्ठित बँकेत करिअर करण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे.






