Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कस्टम विभागामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; अशा प्रकारे करता येईल अर्ज

भारताच्या कस्टम विभागामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. तसेच या भरतीच्या माध्यमातून ४० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 21, 2024 | 06:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सरकारी क्षेत्रामध्ये कामाच्या संधीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारताच्या कस्टम विभागामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. एकूण ४० रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सरकारी क्षेत्रात रोजगार करण्याच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी महिला तसेच पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही बाबी पात्र करायच्या आहेत. या भरती विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या बाबी जाहीर अधिसूचनेत नमूद आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिकृत अधिसूचनेचा आढावा नक्की घ्यावा. अधिसूचनचे आढावा घेण्याचा मुख्य हेतू म्हणजे या भरतीला पूर्णपणे आणि सखोल रुपी समजून घेणे आहे.

CBSE २०२५ डेट शीट कधीपर्यंत येणार? ‘या’ संकेतस्थळावर होणार जाहीर

कस्टम विभागाच्या या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे. सर्व उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. परंतु, काही अटी शर्ती आहेत, यांना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्तीना पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी शर्ती अर्ज कर्त्या उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. तर शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. एकंदरीत, एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या आभारतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी आहे कि आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

अधिसूचनेमध्ये शैक्षणिक अटी शर्तीसुद्धा नमूद आहे. एकंदरीत, भारत सरकारच्या कस्टम भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराकडे किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. या अटी शर्तीना पात्र उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज कर्त्या उमेदवाराच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रक्रियेत अर्ज कर्त्या उमेदवारांना लिखित परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच दस्तऐवज पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. उमेदवारांना नियुक्तीसाठी ही चाचणीही पात्र करणे आवश्यक आहे. शेवटी, मुख्य मेरिट लिस्टच्या आधारे नियुक्तीच्या संदर्भांत माहिती मिळून जाईल.

Delhi Air Pollution: प्रमुख विद्यापिठांकडून ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय !

अशा प्रकारे करा अर्ज

  • सर्वप्रथम उमेदवारांनी कस्टम विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • येथे जाऊन जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
  • अर्जाच्या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जाचा फॉर्म भरून घ्या.
  • मागितली गेलेली सर्व आवश्यक माहिती आणि दस्तऐवजांची पूर्तता करा.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एखादी प्रत भविष्यासाठी स्वतःजवळ काढून ठेवा.

Web Title: Recruitment process begins in customs department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 06:03 PM

Topics:  

  • customs department

संबंधित बातम्या

Gold Smuggling News: दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ९.४० किलो सोने जप्त; सोन्याच्या तस्करीत ‘न्यू ट्रिक्स’चा पर्दाफाश
1

Gold Smuggling News: दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ९.४० किलो सोने जप्त; सोन्याच्या तस्करीत ‘न्यू ट्रिक्स’चा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.