career (फोटो सौजन्य: social media)
बँकिंग क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारी बँकांमध्ये १७,००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आयबीपीएस, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सारख्या मोठ्या बँकेत भरती सुरू आहे. चला जाणून घेऊया कोणत्या बँकेत कोणत्या पदावर आणि किती पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.
SSC CGL २०२५ Postponed: SSC CGL २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली, लवकरच तारीख जाहीर होणार
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन या बँकेत सर्वात जास्त ‘क्लर्क’ (लिपिक) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आले आहे. देशभरातील बँकांमध्ये लिपिक पदांसाठी १०,२७७ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदासाठी १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाले असून २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु राहतील. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे आणि निवड प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेद्वारे केली जाणार.
स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सुद्धा ‘क्लर्क’ (लिपिक) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. एकूण 6,589 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. या पदासाठी 6 अगस्त 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 26 अगस्त 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यात कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात, जर त्यांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असेल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने उत्तर प्रदेशातील बरेली, हरदोई, लखीमपूर खेरी आणि मुरादाबाद या जिल्ह्यांमध्ये बीसी सुपरवायझर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी तरुण उमेदवारांसह, निवृत्त बँक कर्मचारी देखील अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदा (BOB)
बँक ऑफ बडोदाने एकूण ४१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. मॅनेजर सेल्स, ऑफिसर अॅग्रीकल्चर सेल्स आणि मॅनेजर अॅग्रीकल्चर सेल्स या सारख्या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. २६ ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात पदवी आणि सेल्सचा अनुभव असणे गरजेचं आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाने एकूण २५० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. वेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. उमेदवाराकडे एमबीए, एमएमएस, पीजीडीबीए, पीजीडीबीएम, पीजीपीएम किंवा पीजीडीएम या विषयांचा दोन वर्षांचा नियमित अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे. यासाठी शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२५ ही आहे. यात संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
PM Internship Scheme: पीएम इंटर्नशिप योजना म्हणजे काय; कोण करू शकतो apply; किती मिळणार स्टायपेंड?