Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३०४ परीक्षा निष्क्रिय! मुंबई विद्यापीठाने चक्क १२५ परीक्षा केल्या बंद; शून्य विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई विद्यापीठ यांनी शून्य विद्यार्थी नोंदणी आणि कालबाह्य अभ्यासक्रमांमुळे ३०४ परीक्षा निष्क्रिय घोषित केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांत एकाही विद्यार्थ्याने नोंदणी न केलेल्या १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 13, 2026 | 02:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई विद्यापीठ यांनी शून्य विद्यार्थी नोंदणी आणि कालबाह्य अभ्यासक्रमांच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३०४ परीक्षा निष्क्रिय घोषित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्याने नोंदणी केलेली नाही, अशा १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी पूर्ण होऊन १० वर्षांचा टप्पा पार झाला आहे, अशा १७९ परीक्षा देखील बंद करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण ३०४ परीक्षा ‘निष्क्रिय’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

राज्यातील ५ हजार १२ सहायक प्राध्यापक पदांसाठी मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय

शून्य नोंदणी असलेल्या १२५ परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील २३, मानवविज्ञान विद्याशाखेतील १५, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांतील ४२ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४५ परीक्षांचा समावेश आहे. मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, १० वर्षांपूर्वी बंद झालेल्या अभ्यासक्रमांच्या १७९ परीक्षांचाही यात समावेश आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १०, वाणिज्य व व्यवस्थापनातील ८६, मानवविज्ञानातील ३८ आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांतील ४५ परीक्षा आहेत. विद्यापीठाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संबंधित परीक्षांची यादी परिपत्रकाच्या परिशिष्ट १ आणि २ मध्ये उपलब्ध असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नमूद केले आहे.

आता मिटेल बेरोजगारी? नोकरीच्या मोठमोठ्या संधी! देशभरात… रोजगाराची लाट; वाचा 

तथापि, भविष्यात कोणत्याही संलग्नित महाविद्यालय किंवा संस्थेकडून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी नोंदणीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास, संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची बदलती आवड, नवीन अभ्यासक्रमांची वाढती मागणी आणि कालबाह्य विषयांचा कमी होत चाललेला प्रतिसाद या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Web Title: Mumbai university cancelled 125 exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
1

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
2

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
4

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.