Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. पदव्युत्तर, पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 08:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत एकूण ४० पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही योजना गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असून राज्य शासनाकडून संपूर्ण शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पात्रतेच्या निकषांनुसार उमेदवार तसेच त्यांचे आई-वडील किंवा पालक भारताचे नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला किंवा प्रवेशासाठी पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. संबंधित विद्यापीठाचे अद्ययावत (२०२६ मधील) क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ही अट ३०० क्रमांकापर्यंत शिथिल केली जाईल.

उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न (आर्थिक वर्ष २०२५-२६) सर्व स्रोतांद्वारे मिळून ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद आहे. योजनेच्या सविस्तर अटी, शर्ती, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती आदिवासी विकास विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

इच्छुक विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक असून आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावीत. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जासंदर्भातील सर्व सूचना अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे कळविण्यात येतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Tribal development department appeals to apply for scholarships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

LLB CET : ३ वर्षीय एलएलबी सीईटीला राज्यात ८१.९४% विद्यार्थ्यांची उपस्थिती!
1

LLB CET : ३ वर्षीय एलएलबी सीईटीला राज्यात ८१.९४% विद्यार्थ्यांची उपस्थिती!

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026
2

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026

America मध्ये निवृत्त झालेले लोकं पुन्हा  Jobs का शोधाताहेत? जाणून घ्या ‘Unretirement’ ट्रेंडमागचं वास्तव
3

America मध्ये निवृत्त झालेले लोकं पुन्हा Jobs का शोधाताहेत? जाणून घ्या ‘Unretirement’ ट्रेंडमागचं वास्तव

राज्यातील ४१४ ‘आदर्श शाळा’! डॉ. आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकासित करणार
4

राज्यातील ४१४ ‘आदर्श शाळा’! डॉ. आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकासित करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.