Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटी सेक्टरमधील मोठी कंपनी ९००० कर्मचाऱ्यांना घरी बसवणार; दोन महिन्यात दुसऱ्यांदा कामगार कपात

मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीला सुद्धा खर्चाचा ताण सहन करावा लागत आहे, यावरून जागतिक आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2025 | 08:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आयटी क्षेत्रातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सुमारे ९१०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार असून, ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४ टक्के आहे. काही सुत्रांच्या अहवालानुसार, ही छंटनी २०२३ नंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.

नोकरीच्या शोधात आहात? यंदाचा जुलै तुमच्यासाठी खास! ‘या’ भरतींसाठी करा अर्ज

मायक्रोसॉफ्टकडे जून २०२४ पर्यंत जगभरात सुमारे २.२८ लाख कर्मचारी कार्यरत होते. या नव्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी छंटनी केवळ टेक्निकल टीमपर्यंत मर्यादित नसून मुख्यतः सेल्स आणि मार्केटिंग विभागांवर परिणाम होणार आहे. या विभागात सध्या ४५,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, जे कंपनीच्या एकूण मनुष्यबळाचा मोठा हिस्सा आहे.

ही छंटनी कंपनीच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येत आहे. अमेरिकेसह अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मागील काही काळात अशाच प्रकारे छंटनी करत आर्थिक अनिश्चिततेशी सामना करण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी मे २०२५ मध्ये ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं, तर जून २०२५ च्या सुरुवातीला आणखी ३०० कर्मचाऱ्यांवर ही कुरघोडी झाली होती. या दोन्ही छंटनींसाठी कंपनीकडून स्थानिक प्रशासनास नोटिसाही देण्यात आल्या होत्या.

CA बनायचे आहे… पण आर्थिक अडचणी आहेत? जाणून घ्या संपूर्ण आर्थिक गणित

याशिवाय एप्रिल २०२५ मध्ये मायक्रोसॉफ्टने सूचित केलं होतं की, लहान व मध्यम व्यवसायांसाठी सॉफ्टवेअर विक्रीचं काम थर्ड पार्टी एजन्सीकडे दिलं जाईल. त्यामुळेच सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांची भूमिका धोक्यात येणार हे संकेत आधीच मिळाले होते. सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, कंपनीने याआधीही विक्री विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटवण्याचा निर्णय घेतला होता. अद्याप या नव्या छंटनीबाबत मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Web Title: Reduction in employees in microsoft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • IT compony
  • Microsoft

संबंधित बातम्या

९,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने फेटाळला, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
1

९,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने फेटाळला, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

Microsoft 9,000 कर्मचाऱ्यांना काढणार कामावरून, पाकिस्तानमधील कार्यालयाला ठोकले कुलूप
2

Microsoft 9,000 कर्मचाऱ्यांना काढणार कामावरून, पाकिस्तानमधील कार्यालयाला ठोकले कुलूप

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम
4

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.