• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How Much Money Do You Need To Pursue Ca

CA बनायचे आहे… पण आर्थिक अडचणी आहेत? जाणून घ्या संपूर्ण आर्थिक गणित

CA ही पदवी फक्त अभ्यासाची नाही तर चिकाटी, मेहनत आणि समर्पणाची परीक्षाही असते. जर तुमच्याकडे आर्थिक विश्लेषणाची आवड असेल आणि व्यावसायिक जबाबदारी पेलण्याची तयारी असेल, तर CA हे करिअर तुमचं भविष्य उज्वल करू शकतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2025 | 06:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही केवळ डिग्री नाही, तर ती एक प्रतिष्ठेची, कौशल्याची आणि जबाबदारीची व्यावसायिक ओळख मानली जाते. अनेक तरुण-तरुणींचं हे स्वप्न असतं, पण अनेकदा त्यांना आर्थिक अडचणींमुळे गोंधळ वाटतो की, CA व्हायचं म्हणजे नक्की काय करावं लागतं? किती पैसे खर्च येतात आणि नंतर पगार किती मिळतो? चला तर मग जाणून घेऊया याचे संपूर्ण आर्थिक गणित.

CA म्हणजे अशी व्यक्ती जी अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, फायनान्स व बिझनेस अ‍ॅडव्हायजरी यासारख्या क्षेत्रात तज्ज्ञ असते. कंपन्या, सरकारी संस्था किंवा वैयक्तिक क्लायंटसाठी ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. भारतामध्ये ICAI (The Institute of Chartered Accountants of India) ही अधिकृत संस्था आहे जी हा कोर्स चालवते. ICAI ची स्थापना १ जुलै १९४९ रोजी झाली असून याच दिवशी दरवर्षी राष्ट्रीय CA दिन साजरा केला जातो.

शाहू महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप; महापुरुष जयंती उत्सव समितीचा उपक्रम

CA कोर्स पूर्ण करण्यासाठी चार टप्पे असतात. सर्वप्रथम १२वी नंतर CA Foundation परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर CA Intermediate, मग तीन वर्षांची प्रत्यक्ष कामाची ट्रेनिंग म्हणजेच Articleship, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची CA Final परीक्षा द्यावी लागते. जर सर्व परीक्षा एका प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या तर संपूर्ण प्रक्रिया साधारणतः ४.५ ते ५ वर्षांत पूर्ण होते.

आता प्रश्न येतो तो खर्चाचा. Foundation टप्प्यासाठी साधारण ₹40,000 ते ₹70,000 पर्यंत खर्च येतो. Intermediate साठी ₹80,000 ते ₹2 लाख, आणि Final साठी ₹1 ते ₹1.5 लाख खर्च अपेक्षित असतो. याशिवाय स्टडी मटेरियल, री-अटेम्प्ट, ट्रेनिंग यावरही काही अतिरिक्त खर्च होतो. एकूण मिळून जर सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केल्या, तर सुमारे ₹3 ते ₹4 लाखांत हा कोर्स पूर्ण होतो.

विवा महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन; अंमली पदार्थ विरोधात करण्यात आली जनजागृती

CA झाल्यावर मिळणाऱ्या पगाराबाबत बोलायचं झालं, तर फ्रेशर्सना वार्षिक ₹6 ते ₹10 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटचा पगार ₹12 ते ₹50 लाखांपर्यंत जाऊ शकतो. जे स्वतःची प्रॅक्टिस करतात, त्यांना त्यांच्या क्लायंटच्या संख्येनुसार ₹10 लाखांपासून ₹1 कोटींपर्यंतही उत्पन्न मिळू शकतं. परदेशातही या क्षेत्रात मोठ्या संधी आणि भरघोस पगार मिळतो.

CA झाल्यानंतर करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतात – ऑडिट, टॅक्स सल्लागारी, फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट, इन्वेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर, रिस्क मॅनेजमेंट, सरकारी सेवा (जसं की CAG, RBI, PSU) आदी क्षेत्रांमध्ये रोजगाराची दारं उघडतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर CA ही फक्त शैक्षणिक पदवी नसून, ती एक चाचणी आहे. चिकाटीची, मेहनतीची आणि व्यावसायिक समर्पणाची. जर तुमचं आर्थिक जगात करिअर करण्याचं स्वप्न असेल आणि तुम्ही त्यासाठी मेहनत करायला तयार असाल, तर CA ही तुमच्यासाठी उत्तम दिशा असू शकते.

Web Title: How much money do you need to pursue ca

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • CA Result

संबंधित बातम्या

२१ सप्टेंबरची असाक्षरांची चाचणी पुढे ढकलण्याची मागणी! “धार्मिक संवेदनांचा आदर…”
1

२१ सप्टेंबरची असाक्षरांची चाचणी पुढे ढकलण्याची मागणी! “धार्मिक संवेदनांचा आदर…”

ICAI CA Final मे 2025 चा निकाल लवकरच, कसे तपासाल?
2

ICAI CA Final मे 2025 चा निकाल लवकरच, कसे तपासाल?

सीए परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी; आता ‘या’ तारखेपासून घेतली जाणार परीक्षा
3

सीए परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी; आता ‘या’ तारखेपासून घेतली जाणार परीक्षा

भारत-पाकिस्तान तणाव वाढला; ICAI कडून CA परीक्षांचे पेपर पुढे ढकलले
4

भारत-पाकिस्तान तणाव वाढला; ICAI कडून CA परीक्षांचे पेपर पुढे ढकलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.