Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडचणींवर मात करून IAS अधिकारी झाल्या संजिता महापात्रा; अपयशाला न जुमानता जिद्दीने गाठले यश

आयएएस अधिकारी संजिता महापात्रा यांनी सततच्या अपयशानंतरही हार न मानता आपले स्वप्न पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर त्यांनी सेलमध्ये नोकरी करत यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 20, 2026 | 05:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

यश मिळवण्याचा मार्ग सोपा नसतो, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मात्र, अपयशातून खचून न जाता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या व्यक्ती प्रेरणादायी ठरतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे आयएएस अधिकारी संजिता महापात्रा. सततच्या अपयशानंतरही त्यांनी हार न मानता अखेर आपले स्वप्न पूर्ण केले. संजिता महापात्रा यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. मात्र, प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नव्हते.

डिझाइन क्षेत्रात करिअरची संधी; ‘बॅचलर ऑफ डिझाइन’ कोर्सकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

संजिता यांनी सलग चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण प्रत्येक वेळी अपयश पदरी पडले. वारंवार येणाऱ्या अपयशांमुळे त्या काही काळ निराश झाल्या. चौथ्या प्रयत्नानंतर त्यांचे लग्न झाले आणि आयुष्याची जबाबदारीही वाढली. या काळात नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल राखणे कठीण होत गेले. तरीही आयएएस होण्याचे स्वप्न त्यांनी मनातून कधीच काढून टाकले नाही.

अखेर, परीक्षेची पूर्ण ताकदीने तयारी करण्यासाठी संजिता यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून पुन्हा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, पण आपल्या स्वप्नासाठी धोका पत्करण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी इंटरनेट, ऑनलाइन अभ्यास साहित्य आणि विविध शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःची अभ्यासयोजना तयार केली.

पाचव्या प्रयत्नात संजिता यांच्या मेहनतीला अखेर यश आले. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. अपयशातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करत त्यांनी आपली तयारी अधिक मजबूत केली आणि आत्मविश्वास कायम ठेवला.

संजिता महापात्रा यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोलाचा सल्ला देतात. त्या सांगतात की, यूपीएससीसाठी तयारी करताना एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत महत्त्वाची आहेत. मूलभूत संकल्पना मजबूत असतील, तर पुढील अभ्यास सोपा होतो. तयारीच्या काळात अनेक अडचणी येतील, अपयशही येऊ शकते, मात्र त्यातून खचून न जाता आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

अकाउंटिंग क्षेत्रात करिअरची भक्कम पायाभरणी; ‘बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंग’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा

“तुमची प्रेरणा कधीही कमी होऊ देऊ नका. तयारीसाठी १०० टक्के द्या. जरी तुम्ही अपयशी ठरलात, तरी या प्रक्रियेत मिळालेले ज्ञान आणि अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतील,” असा सल्ला त्या देतात.

संजिता महापात्रा यांची ही यशोगाथा यूपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अपयश कितीही वेळा आले तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर यश नक्कीच मिळते, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले आहे.

Web Title: Sanjita mahapatra became an ias officer by overcoming obstacles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश
1

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.