Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI PO Prelims 2026 अपडेट! परीक्षा कधी? रिपोर्टिंग टाइम आणि गाईडलाइन्स जाहीर

SBI PO Prelims 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) प्राथमिक परीक्षा 1 आणि 2 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात आयोजित केली जाणार आहे. यंदा 1,500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील माहिती, परीक्षा केंद्र, रिपोर्टिंग वेळ आणि आवश्यक कागदपत्रे आधीच तपासून ठेवावीत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 31, 2026 | 03:10 PM
SBI PO Prelims 2026 अपडेट! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

SBI PO Prelims 2026 अपडेट! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI PO Prelims परीक्षा 1 आणि 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार 
  • यंदा SBI मध्ये 1,500 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती 
  • उमेदवारांनी प्रवेशपत्रातील सर्व माहिती आणि परीक्षा केंद्राची खात्री करून घ्यावी.
  • वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचून आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
SBI PO Prelims 2026 Exam Update: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) भरतीसाठी होणारी प्राथमिक परीक्षा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यंदा बँकेत एकूण 1,500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी कोणतीही गडबड होऊ नये, म्हणून प्रवेशपत्रातील सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्यावी.

परीक्षेच्या दिवशी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे, आवश्यक कागदपत्रेसोबत ठेवणे आणि परीक्षा नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे परीक्षा देता येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळावी.

चार सत्रांमध्ये होणार परीक्षा

SBI PO प्राथमिक परीक्षा दोन दिवसांता आणि चार वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराची परीक्षा कोणत्या सत्रात आहे, याची माहिती प्रवेशपत्रावर दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या शिफ्टची वेळ आधीच तपासून ठेवावी….

पहिले सत्र

रिपोर्टिंग वेळ : सकाळी 8.00 वाजता
परीक्षा : सकाळी 9.00 ते 10.00

दुसरे सत्र

रिपोर्टिंग वेळ : सकाळी 10.30
परीक्षा : सकाळी 11.30 ते दुपारी 12.30

तिसरे सत्र

रिपोर्टिंग वेळ : दुपारी 1.00
परीक्षा : दुपारी 2.00 ते 3.00

चौथे सत्र

रिपोर्टिंग वेळ : दुपारी 3.30
परीक्षा : सायंकाळी 4.30 ते 5.30

परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी रिपोर्टिंग वेळेचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. उशिरा पोहोचणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

परीक्षा केंद्रावर कोणती कागदपत्रे आवश्यक?

परीक्षेला जाताना प्रवेशपत्राची प्रिंट सोबत असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड Aadhaar Card, पॅन कार्ड Pan Card, मतदान ओळखपत्र Voting Card , पासपोर्ट Passport किंवा ड्रायव्हिंग लायसन्स Driving License यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र जवळ ठेवावे. याशिवाय अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटोही सोबत ठेवणे योग्य ठरेल. कागदपत्रांमध्ये कोणतीही विसंगती असल्यास परीक्षा केंद्रावर अडचणी निर्माण होऊ शकतात.

RRB Group D Admit Card 2026 आजच येणार? अपेक्षित तारीख, वेळ आणि Downloadची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या…

‘या’ वस्तू सोबत ठेवू नका

परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्टवॉच Smart Watch, ब्लूटूथ इअरफोन Bluetooth , कॅल्क्युलेटर Calculator किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण Electronic equipment नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच पुस्तकं Books, नोट्स Notes, लिहिलेल्या चिठ्ठ्या किंवा अभ्यासाचे साहित्यही सोबत नेऊ नये. परीक्षा केंद्रावर अशा वस्तू आढळल्यास उमेदवारावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही वस्तू न नेणेच सुरक्षित ठरेल.

परीक्षेच्या दिवशी ‘या’ सूचना लक्षात ठेवा

परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा कक्षात दिलेल्याच जागेवर बसावे आणि निरीक्षकांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचे पालन करावे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा नियमभंग टाळणे आवश्यक आहे.

तसेच शेवटच्या क्षणी घाई होऊ नये म्हणून परीक्षा केंद्राचे ठिकाण एक दिवस आधीच तपासून ठेवणे फायद्याचे ठरते. शक्य असल्यास केंद्रावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, याचाही अंदाज घेऊन घरातून वेळेत निघावे.

परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शांत राहा आणि आत्मविश्वास ठेवा

परीक्षेपूर्वी अनावश्यक ताण घेण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचा आणि सर्व नियमांचे पालन करा. योग्य नियोजन आणि शांत मनाने दिलेली परीक्षा चांगल्या निकालासाठी नक्कीच मदत करू शकते.

Web Title: Sbi po prelims 2026 update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Admit Card Release Date
  • Sbi Job
  • SBI Recruitment 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.