फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉंबेमधील २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहेत. अनेक मोठया कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे. IIT बॉंबे मंगळवारी आपलिक प्लेसमेंट रिपोर्ट जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी प्लेसमेंटसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. या वाढीला कारण म्हणजे यंदाच्या वर्षी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ११% टक्क्यांची वाढ झालेली आहे. एकूण २,४१४ विद्यार्थ्यांनी या अर्ज प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता. जे आकडे इतर शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत अधिक आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये IIT बॉंबेमधील २,४१४ विद्यार्थ्यांनी प्लेमेंटसाठी अर्ज केले होते. या प्रक्रियेमध्ये १,६५० विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑफर केले आहे. मुळात अर्ज कर्त्या २,४१४ या विद्यार्थ्यांच्या संख्येतील १,९७९ विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सक्रिय होते. सगळ्यात विशेष बाब म्हणजे या संख्येतील २२ जणांना कोटींच्या घरामध्ये पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. तर ७८ विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन नोकरी करण्याची प्लेसमेंट मिळाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना उच्च पगाराची नोकरी मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. एकंदरीत, IIT बॉंबेच्या या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना १७.९२ लाख रुपये प्रतिवर्ष इतके सरासरी पगार मिळेल. या भरती प्रक्रियेमध्ये खासकरून अभियांत्रिकी तसेच औद्योगिकरणातील कंपन्यांनी भाग घेतला आहे.
IIT बॉंबे मधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. यातील ५५८ विद्यार्थ्यांना २० लाखांहून अधिकचा पॅकेज देणारी नोकरी मिळाली आहे. २३० विद्यार्थ्यांना १६.७५ ते २० लाखांच्या दरम्यान वार्षिक पॅकेज देणारी नोकरी मिळाली आहे, तर २२७ जणांना १४ लाखांपासून ते १६.७५ लाखांइतके पॅकेज देणारी कंपनी आहे. मुळात, विद्यार्थ्यांना ४ लाखांहुन जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनींकडून प्लेसमेंट देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : राज्यात 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक, 62 हजार 550 रोजगार निर्मिती होणार – फडणवीस
महत्वाची बाब म्हणजे यंदाची प्लेसमेंट IIT बॉंबेच्या इतिहासातील दुसरी सगळ्यात मोठी प्लेसमेंट आहे. २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये १,५१६ विद्यार्थ्यांना नोकरी पुरवण्यात आली होती. जी यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या संख्येपेक्षा थोडीसी जास्त आहे. यंदाची प्लेसमेंट टक्केवारी ७५% इतकी आहे. कॅव्हिडच्या महामारीनंतर देशाने परत विकासाकडे झेप घेतली असल्याचे दिसून येत आहे.