Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहावीची विद्यार्थिनी तपासतेय दहावीचा पेपर! संबंधित शिक्षकाला सुनावण्यात आले दंड

दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सहावीच्या विद्यार्थिनीने हाताळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ने संबंधित शिक्षकावर कारवाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 15, 2026 | 02:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सहावीच्या विद्यार्थिनीने तपासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून करण्यात आलेल्या चौकशीत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल शिक्षकाचे मानधन जप्त करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका शाळेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. या शाळेत दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू असताना संबंधित शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनीला उत्तरपत्रिका हाताळण्यास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण मंडळाने तात्काळ चौकशी सुरू केली.

तब्बल 3 वर्षे अधिछात्रवृत्तीची जाहिरातच नाही? विद्यार्थ्यांचा संघर्ष अन् पाठपुरावा…; विषय काय?

चौकशीदरम्यान संबंधित विद्यार्थिनी उत्तरपत्रिकांवरील कोऱ्या पानांवर रेषा मारत असल्याचे आढळून आले. जरी विद्यार्थिनीने उत्तरांचे मूल्यमापन केले नसले तरी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हाताळण्यास देणे हे नियमांच्या विरोधात असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. उत्तरपत्रिकांची गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकाराकडे गंभीरतेने पाहण्यात आले. या प्रकरणी संबंधित शिक्षक वैभव शेंडे यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून उत्तरपत्रिका तपासणीचे संपूर्ण मानधन जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांनी तपासलेल्या मराठी विषयाच्या सर्व उत्तरपत्रिका मंडळाने ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, शिक्षकाने तपासलेल्या एकूण १२५ उत्तरपत्रिका मंडळामार्फत ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर कोणताही परिणाम होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी हमी मंडळाने दिली आहे. या संदर्भात कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष Rajesh Kshirsagar यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल विभागीय मंडळाच्या सक्षम समितीसमोर पुढील बैठकीत ठेवण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशींनुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सुतार कामगिरीत हुशार आहात? या उद्योगातून कमवा बक्कळ पैसा, पण कसे? जाणून घ्या

दरम्यान, या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थिनी उत्तरपत्रिकांवरील कोऱ्या पानांवर रेषा मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी मंडळाकडून संबंधित केंद्रांना कडक सूचना देण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Sixth grade student evaluates 10th grade paper concerned teacher penalized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

दहावीच्या प्रश्नपत्रिकेची चोरी! केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी निलंबित : पेपर नियोजित वेळेत
1

दहावीच्या प्रश्नपत्रिकेची चोरी! केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी निलंबित : पेपर नियोजित वेळेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.