सारथीची संशोधन अधिछात्रवृत्तीची जाहिरात कधी? (फोटो- सोशल मीडिया)
संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
विद्यार्थी सातत्याने करतायेत संघर्ष आणि पाठपुरावा
शासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
पुणे: सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीची जाहिरात मार्च २०२३ नंतर आजतागायत प्रसिद्ध झालेली नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीसाठी संशोधक विद्यार्थी सातत्याने संघर्ष आणि पाठपुरावा करत असून शासनाने तातडीने या विषयात लक्ष घालून जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थांकडून (Career News) करण्यात येत आहे.
या संदर्भात संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले की, अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नियोजन अडचणीत आले आहे. या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुण्यातील सारथी मुख्य कार्यालयासमोर २१ दिवस बेमुदत उपोषण केले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
संशोधकाच्या मागण्या
संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी संस्थांच्या संशोधन अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार किमान ३०० ठेवावी. प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करावी. संशोधन विषयाच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करावी या आहेत.
राज्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार! 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला गती
“ऑक्टोबर २०२५ मध्ये आठ दिवसात सारथी,महाज्योती,बार्टी संशोधन अधिछात्रवृत्ती जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी दिले होते परंतु ४ महिने उलटून गेले तरी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ कडून आम्हाला भरीव तरतुदीसह नवीन जाहिरात घोषणेची अपेक्षा होती परंतू त्याबद्दल अर्थसंकल्पात काहीच उल्लेख नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील नवोदित संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.”
-दयानंद जयपाल पवार
संशोधक विद्यार्थी,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
नृत्यांगना म्हणून करायचे आहे करिअर? काय करावे? जाणून घ्या
“घरी अवघी दिड एकर शेती असूनसुद्धा आमच्या कुटुंबातील उच्च शिक्षण,कृषी संशोधनापर्यंत पोहचलेली मी पहिली मुलगी. पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर अधिछात्रवृत्ती मिळेल व गुणवत्तापूर्ण संशोधन करू शकेल अस वाटलं होत परंतु तीन वर्ष होत आली पण कसलंच आर्थिक पाठबळ नाही.त्यामुळे या वर्षी कसतरी पीएचडी पूर्ण करून संशोधनातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे.”
-आशा भारत देशमाने,
संशोधक विद्यार्थिनी,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी.






