Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Railway Sports Quota Bharti: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत ५४ खेळाडू पदांसाठी भरती जाहीर. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पात्रता, वयोमर्यादा आणि शुल्काबाबत जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 28, 2026 | 03:54 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Railway Sports Quota Bharti: रेल्वेमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साउथ ईस्टर्न रेल्वेने ५४ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे या भरतीमध्ये वेगवेगळे खेळाडू अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी लेवल पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होऊन ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार  रेल्वेच्या www.rrcser.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.

भरतीसाठी पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ते ज्या लेव्हलसाठी अर्ज करत आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता आणि खेळाचे किमान निकष दोन्ही असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे तर ग्रुप सी लेव्हलच्या पदांसाठी उमेदवराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तर ग्रुप सी पदांसाठी उमेदवार १२ वी पास किंवा  १० वी सोबत आयटीआय पास असावा. ग्रुप डी लेव्हल १ च्या पदांसाठी उमेदवारांकडे १० वी पास आयटीआय किंवा एनसीव्हीटी कडून प्राप्त नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय आहे?

या भरतीसाठी उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२७ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००९ दरम्यान झालेला असावा. वयाच्या पुराव्यासाठी उमेदवाराला १० वीची मार्कशीट किंवा जन्म दाखला द्यावा लागेल.

अर्ज शुल्क किती भरावे लागेल?

या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, महिला, दिव्यांग, माजी सैनिक आणि इतर सूचीबद्ध प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क द्यावे लागेल. ट्रायल्समध्ये (Trials) सहभागी झाल्यानंतर जनरल आणि ओबीसी उमेदवारांना ४०० रुपये शुल्क परत (Refund) केले जाईल. तर एससी, एसटी आणि इतर उमेदवारांचे संपूर्ण २५० रुपये शुल्क परत केले जाईल. तसेच या भरतीत एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी कोणतीही पदे आरक्षित नाहीत. उमेदवारांची निवड ही संपूर्णपणे गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाईल.

Free Coaching in Nanded: फायनान्शियल प्रॉब्लेम बाय-बाय! आता NEET, JEE आणि MHT-CET चे मिळणार मोफत कोचिंग!

कोणत्या क्रीडा उपलब्धता आवश्यक आहेत?

ही भरती क्रीडा कोटामधून (Sports Quota) होत असल्याने, उमेदवारांकडे खेळाशी संबंधित वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांकडे १ एप्रिल २०२४ किंवा त्यानंतरची क्रीडा उपलब्धी असणे गरजेचे आहे. लेव्हल ४ आणि ५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व किंवा काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकल्याची कामगिरी असावी. याशिवाय लेव्हल २ आणि ३ साठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग असावा. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा (National Championship), राष्ट्रीय खेळ (National Games) किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धांमधील (Inter University Championship) कामगिरी असणे आवश्यक आहे. तसेच लेव्हल १ च्या उमेदवारांसाठी निर्धारित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग असावा.

NTA Helpline Numbers: आता विद्यार्थ्यांच्या अडचणी संपणार! NTA ने जारी केले ‘हे’ नवीन हेल्पलाईन नंबर्स

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले www.rrcser.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. त्यानंतर ‘Sports Quota Open Advertisement 2026-27’ या अर्ज लिंकवर क्लिक करा.

3. आता ‘New Registration’ वर क्लिक करून स्वतःची नोंदणी (Registration) करा.

4. त्यानंतर तुमचे नाव, जन्मम तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आणि इतर आवश्यक माहिती भरा.

5. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती आणि खेळातील कामगिरीचा तपशील भरा.

6. आता विचारलेले फोटो, सही आणि क्रीडा प्रमाणपत्र (Sports Certificate) अपलोड करा.

7.शेवटी अर्ज शुल्क भरून, फॉर्म काळजीपूर्वक तपासून तो सबमिट करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येणार आहेत?

    Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणार आहे.

  • Que: या भरतीसाठी वयोमर्यादा किती ठेवली आहे?

    Ans: उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२७ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

  • Que: अर्ज कुठे जाऊन करायचा आहे?

    Ans: इच्छूक उमेदवार रेल्वेच्या www.rrcser.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Web Title: South eastern railway sports quota recruitment 2026 marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • centrail railway
  • Government Job
  • job news

संबंधित बातम्या

Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?
1

Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?

Head Constable Recruitment 2026: भारतीय सैन्यात भरती होण्याची अंतिम संधी! ITBP हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लगेच अर्ज करा.
2

Head Constable Recruitment 2026: भारतीय सैन्यात भरती होण्याची अंतिम संधी! ITBP हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लगेच अर्ज करा.

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप
3

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप

Medical Career Guide: डॉक्टर बनायचयं? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतील तर दोनदा विचार करा!
4

Medical Career Guide: डॉक्टर बनायचयं? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतील तर दोनदा विचार करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.