Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवा महाविद्यालयात विशेष व्याख्यान; “अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चर” विषयावर करण्यात आली चर्चा

विवा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चर" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. महिला आरोग्य सुधारण्यासाठी या उपचारपद्धतींचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 11, 2025 | 04:00 PM
विवा महाविद्यालयात विशेष व्याख्यान; “अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चर” विषयावर करण्यात आली चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विवा महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅक्युप्रेशर अँड अ‍ॅक्यूपंक्चर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्टिफाइड अ‍ॅक्यूपंक्चरिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट डॉ. शैला सावंत, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा आणि महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख प्राक्तना कोरे उपस्थित होत्या.

मराठी मुलांसाठी स्पेशल भरती! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २२ रिक्त पदांसाठी Vaccancy

या सत्राचे उद्दीष्ट अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्यूपंक्चरच्या उपचारात्मक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट ठिकाणी दबाव आणि सुया वापरणाऱ्या या प्राचीन चीनी उपचारपद्धतींचे महत्त्व या सत्रात स्पष्ट करण्यात आले. डॉ. शैला सावंत यांनी ताण-तणाव व्यवस्थापन, वेदना कमी करणे आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर व अ‍ॅक्यूपंक्चर किती प्रभावी ठरू शकतात, यावर सखोल मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांना भेडसावणाऱ्या समस्या जसे की हार्मोनल असंतुलन, मासिक पाळीतील तक्रारी, भावनिक असंतुलन आणि मानसिक तणाव यावर या पद्धतींचा प्रभावी परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्रादरम्यान सहभागींसाठी तणावमुक्ती आणि वेदना व्यवस्थापनासाठी उपयुक्त अशा सहज करता येण्याजोग्या अ‍ॅक्युप्रेशर तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामुळे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नैसर्गिक उपचारपद्धतींबद्दल मौल्यवान माहिती मिळाली. त्यानंतर झालेल्या परस्पर चर्चेत विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून अधिक माहिती मिळवली.

विवा महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ कार्यक्रमाचे आयोजन; अभिवाचनातून ऐकू आले ऐतिहासिक महिला विचार

या कार्यक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय  हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, तसेच व्यवस्थापन समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये, आणि विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉ. दीपा वर्मा आणि डॉ. प्रियांका ब्रिद यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सक्षमीकरण कक्ष समिती सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गाने विशेष मेहनत घेतली. या व्याख्यानामुळे महिलांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक आणि प्राचीन उपचार पद्धतींच्या महत्त्वावर प्रकाश टाकला गेला आणि त्याचा सकारात्मक लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.

Web Title: Special lecture on acupressure and acupuncture at viva college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी
1

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा
3

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.