Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Paper Leak Case: बारावी पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यासह ५ जणांना अटक

या साखळीचा मागोवा घेत पोलिस 'एक्सीलेंट ट्यूशन क्लास' पर्यंत पोहोचले. तेथील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आलेले प्रश्नपत्र १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने 'टेक १' ग्रुपवर पोस्ट केल्याचे समजले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 28, 2026 | 05:55 PM
Nagpur Paper Leak Case: बारावी पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यासह ५ जणांना अटक
Follow Us
Follow Us:
  • विशाखा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य; पेपर पुरवल्याचा आरोप
  • व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केमिस्ट्री आणि गणिताचे प्रश्न शेअर केले
  • प्राचार्याला प्रश्नपत्र पुरवल्याच्या आरोपाखाली अटक.
Nagpur Paper Leak Case: बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक तर एक आरोपी पसार आहे. फरहान अख्तर फहीम अख्तर (रा. ऑटोमोटिव्ह चौक), दिनेश कोटांगळे (३७, रा. कबीरनगर, नारी रोड), मनीष शंभरकर (४६, रा. गोदाम प्रदीप ले-आऊट, त्रिमूर्तीनगर), भयायालाल जांगडे (४३, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) आणि संदीप बाबुराव सरटकर (४६, रा. जयताळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मुस्तफा मुनीर खान (४२, रा. भानखेडा), जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद (२४, रा. हसनबाग) आणि निशिकांत सुखदेव मूल (४०, रा. झिंगाबाई टाकळी) यांना अटक केली होती. ते कारागृहात आहेत. अल्ताफ गोडिल नावाचा आरोपी पसार आहे.

सदर पोलिसांनी १९ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. आरोपी निशिकांत मूलने मोबाईलवरून एचएससी बोर्डाच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाचे प्रश्नपत्र परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केले. त्यानंतर फरहान अख्तरने त्याच ग्रुपमध्ये संबंधित प्रश्नांची उत्तरे शेअर केली. चौकशीत प्रश्नपत्र ‘टेक १’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत प्रसारित झाल्याचे उघड झाले.

एम्सच्या जेवणात किडे आढळल्याने खळबळ; पथकाने अचानक तपासणी सुरु केली अन्…

या साखळीचा मागोवा घेत पोलिस ‘एक्सीलेंट ट्यूशन क्लास’ पर्यंत पोहोचले. तेथील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आलेले प्रश्नपत्र १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ‘टेक १’ ग्रुपवर पोस्ट केल्याचे समजले. पुढील चौकशीत एक्सीलेंट अकादमीशी संबंधित जुनेद याने संबंधित ग्रुपमध्ये प्रश्नपत्र फॉरवर्ड केल्याचे स्पष्ट झाले, तसेच एक्सीलेंट ट्यूशन क्लासचा संचालक मुस्तफा खानला या प्रकाराची माहिती होती आणि प्रश्नपत्र त्याच्या मोबाईलवरही प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली.

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपव

ज्युनिअर कॉलेजपर्यंत पोहोचला तपास

तपासादरम्यान दिनेश कोटांगळे याचे नाव पुढे आले, त्याने कॉट्सअॅपद्वारे कैमिस्ट्री आणि गणिताचे प्रश्नपत्र शेअर केल्याचा आरोप आहे. चौकशीत समोर आले की, त्याच्या परिचयातील फरार आरोपी अल्ताफ गोडिल याने बारावी बोर्डाचा पेपर आधीच मिळवून देण्याची मागणी केली होती. यानंतर कोटांगळे याने सहारे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर एज्युकेशन अकादमीचा संचालक मनीष शंभरकर याच्या माध्यमातून विशाखा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रदीप भय्यालाल जांगडे यांची भेट घेतली.

कोटांगळे आणि गोडिल यांनी जांगडे याच्याकडून केमिस्ट्रीचे प्रश्नपत्र व एमसीक्यू मिळवून ते व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केल्याचा आरोप आहे. तसेच २१ फेब्रुवारला झालेल्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका व उत्तरेही आरोपींच्या मीचाईलवर पाठविल्याचे तपासात उघड झाले. चौकशीत जांगडे यांनी प्रश्नपत्र सरटकर याच्याकडून मिळाल्याचे सांगितल्याने पोलिसांनी संदीप सरटकर यालाही अटक केली. सर्व आरोपीना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोटडी सुनावली.

 

Web Title: 5 people including the mastermind of the 12th paper leak including the principal of the junior college arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Educational News
  • HSC Exam 2026
  • Nagpur News

संबंधित बातम्या

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
1

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
2

नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न
3

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
4

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.