फोटो सौजन्य - Social Media
बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खास खबर! खुश खबर! हे लेख वाचा आणि आजच या भरतीसाठी अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्रने या भरतीचे आयोजन केले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या bankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. उमेदवारांना अर्ज १५ मार्च २०२५ पर्यंत करता येणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये काही पात्रता निकष नमूद करण्यात आले आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणारा उमेदवार या निकषांना पात्र असणे आवश्यक आहे. अन्यथा, उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
जर उमेदवाराने केलेले अर्ज अपूर्ण असेल तर ते नाकारले जाण्याचे अधिक शक्यता असतात. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या अन्यथा तेथे नमूद करण्यात आलेले महत्वाचे तपशील तपासून घ्या. उमेदवारांना काही निकष पात्र करायचे आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अर्ज करताना उमेदवारांकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, अतिरिक्त आवश्यक प्रमाणपत्रे (निकषांनुसार) यांचा समावेश आहे.
उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायची आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० रुपये भरायचे आहे. EWS आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹११८० अशी सारखीच रक्कम भरायची आहे. SC / ST / PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एकूण ११८ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज :