घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)
रेल्वे रिक्रुटमेंट सेलने नव्या भरतीची घोषणा केली आहे. या संदर्भातील अधिसूचना १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यता, रेल्वेची ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेने जाहीर केली आहे. या भरतीमध्ये स्पोर्ट्स कोट्याच्या हवाल्यातुन उमेदवारांना नियुक्तीची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट्य खेळाडूंना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे. या भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये पत्ता नमूद आहे.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विजेत्या शाळा जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळांना देण्यात आले पुरस्कार
पात्र उमेदवारांना त्यांच्या भरतीचा भरलेला फॉर्म अधिसूचनेत नमूद पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरती संदर्भात सखोल माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी rrchubli.in, swr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भारतीय रेल्वेने खास क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी स्पोर्ट्स कोट्यामधून जाहीर केलेल्या या भरतीमध्ये लेवल ४ आणि ५ च्या पोस्टसाठी ५ रिक्त जागा आहेत. लेव्हल २ आणि ३ च्या पोस्टसाठी १६ जागा तर लेव्हल १ च्या पोस्टसाठी २५ जागा शिल्लक आहेत.
उमेदवारांना या भरतीसाठी काही अटी शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध पदांसाठी अटी शर्ती वेगवेगळ्या आहेत. परंतु, या सर्वांमध्ये सामान्य गोष्ट अशी आहे कि सर्व पदांसाठी अर्ज कर्ता उमेदवार खेळात उत्तम असला पाहिजे. या भरतीसाठी उमेदवारांना १९ ऑक्टोबरपासून अर्ज कर्ता येणार आहे. तसेच नोव्हेंबरच्या १९ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच RRC च्या या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शाळेत ७५ टक्के हजेरी अनिवार्य; अन्यथा ‘ही’ होणार कारवाई
RRC SWR Sports Quota Recruitment 2024 च्या निवड प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवारांना या भरतीमध्ये नियुक्ती प्राप्त करण्यासाठी या सर्व टप्यांना पात्र असावे लागणार आहे. यामध्ये स्पोर्ट्स ट्रायल, शारीरिक चाचणी, दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे. लेव्हल ४ तसेच ५ च्या पोस्टसाठी अर्ज करता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर हवा. लेव्हल २ आणि ३ च्या पोस्टसाठी इच्छुक उमेदवार किमान HSC उत्तीर्ण हवा. तर दहावी उत्तीर्ण असलेला क्रीडापटू उमेदवार लेव्हल १ च्या पोस्टसाठी अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.