
ssc cgl
SSC CGL Exam 2026 Schedule: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ‘सीजीएल परीक्षा २०२६’ (CGL Exam 2026) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, SSC CGL टियर-१ परीक्षा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ही परीक्षा संगणकावर आधारित (CBT) पद्धतीने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर अनेक शिफ्ट्समध्ये आयोजित केली जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये एकूण १२,२५६ पदांवर नियुक्त्या केल्या जातील. यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इनकम टॅक्स इन्स्पेक्टर, सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि ऑडिटर यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
एसएससी सीजीएल टियर-१ परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. हा पेपर एकूण २०० गुणांचा असेल आणि प्रत्येक सेक्शनमधून २५-२५ प्रश्न असतील.
या वेळी SSC CGL 2026 परीक्षेच्या पॅटर्नमध्ये वेळेच्या संदर्भात सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे:
ॲडमिट कार्ड : परीक्षेच्या २ ते ३ दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.
एसएससी सीजीएलची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल. टियर-१ परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार टियर-२ साठी पात्र ठरतील. टियर-२ परीक्षा डिसेंबर २०२६ मध्ये प्रस्तावित आहे. अंतिम निवड टियर-१ आणि टियर-२ मधील उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल.