Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन,शस्त्रक्रियेसाठी केला जाणार रोबो तंत्रज्ञानाचा वापर

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याद्वारे केले गेले. विशेष म्हणजे हे राज्यातील पहिलेच अत्याधुनिक मॅाड्युलर थिएटर आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 23, 2024 | 05:34 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले असून या थिएटरचे उद्घाटन हे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेच्या 15 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच सर्व सुविधायुक्त थिएटर आहे. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश जतकर, अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ.रोहिदास चव्हाण, कॅन्सर थेरपी तज्ज्ञ डॉ.आशुतोष गावंडे, डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ.रामेश्वर पवार, डॉ.अनिकेत बुचे, डॉ.विनोद राठोड, डॉ.स्वप्नील मदनकर, डॉ.वल्लभ जाणे, डॉ. विशाल येलके, डॉ. राम टोंगळे आदी उपस्थित होते.

शस्त्रक्रियेसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नव्याने तयार करण्यात आलेले मॅाड्युलर थिएटर राज्यातील सर्वाधित सुविधायुक्त व अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहे. या थिएटरमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रिया लाईव्ह पाहण्याची सुविधा आहे. शस्त्रक्रिया होत असतांना तज्ज्ञांचे शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेचे रेकॅार्डींग करण्याची सोय आहे. अत्याधुनिक सुविधांसह शस्त्रक्रियेसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी केला जाणार आहे.

पालकमंत्री राठोड यांनी महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी रुपयांची तरतूद थिएटरसाठी उपलब्ध करून दिली होती. आज हे थिएटर रुग्णसेवेत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रवाभी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट स्कील लॅबचे लोकार्पण

शल्यचिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रीयेचे कौशल्य अधिक उत्तमपणे अंगीकारता यावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 6 कोटी 25 लक्ष रुपये खर्चातून महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट स्कील लॅब सुरु करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन मंत्री श्री. राठोड यांनी केले. लॅबमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या शल्यचिकित्सा शस्त्रक्रिया करण्याचे आधुनिक प्रशिक्षण प्राप्त होणार आहे.

अत्याधुनिक श्रवणदोष मापक कक्ष

महाविद्यालयात कर्णबधीर रुग्णांचा श्रवणदोष अचूक मोजण्यासाठी अत्याधुनिक श्रवणदोष मापक यंत्र बसविण्यात आले आहे. या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. खनिज विकास निधीतील 32 लक्ष रुपये खर्च करून हा कक्ष तयार करण्यात आला आहे. कक्षामुळे कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांची अचूक तपासणी होणार आहे. विशेष म्हणजे कर्णबधीर बालकांसाठी हा कक्ष अधिक उपयुक्त ठरतील.

कर्णबधीर रुग्णांना श्रवण यंत्राचे वाटप

वैद्यकीय महाविद्यालयात श्रवण दोषाच्या उपचारासाठी दाखल रुग्णांना पालकमंत्र्यांनी श्रवण यंत्राचे वाटप केले. खनिज विकास निधीतून सुमारे 250 रुग्णांना मोफत हे यंत्र देण्यात येत आहे. कानाला यंत्र लावल्यानंतर ऐकू येत असल्याने आनंदाचे भाव रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

Web Title: State of the art modular operation theater inaugurated at yavatmal medical college robotic technology will be used for surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 05:34 PM

Topics:  

  • sanjay rathod
  • Yavatmal

संबंधित बातम्या

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने शेतकऱ्याचा टोकाचा पाऊल;  युवतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने शेतकऱ्याचा टोकाचा पाऊल; युवतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन हत्यांनी यवतमाळ हादरलं! भरदिवसा युवकाचा चाकूने खून, संशयातून पतीकडून पत्नीची तलवारीने हत्या
2

दोन हत्यांनी यवतमाळ हादरलं! भरदिवसा युवकाचा चाकूने खून, संशयातून पतीकडून पत्नीची तलवारीने हत्या

Yavatmal Crime : मुख्याध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जाळला; पोलिसांनी केला हत्येचा उलगडा
3

Yavatmal Crime : मुख्याध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जाळला; पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

Yavatmal : वणी येथील निरगुडा नदी पात्रात घरकूल लाभार्थ्यांसाठी वाळू सत्याग्रह आंदोलन
4

Yavatmal : वणी येथील निरगुडा नदी पात्रात घरकूल लाभार्थ्यांसाठी वाळू सत्याग्रह आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.