Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंजिनिअरिंग मध्ये नापास झालात? टेन्शन नॉट! मिळवणार पुढच्या वर्गात प्रवेश

इंजिनिअरिंगच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आता विषम सत्राच्या निकालाच्या आधारे पुढील सत्रात प्रवेश मिळेल

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2025 | 04:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील वर्गात जाण्यास अडचण येते, त्यांच्यासाठी आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये जसा ATKT चा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, तसाच प्रकार आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

भारताच्या Education System चे आले रिपोर्ट कार्ड, 70% लोकांनी दाखवला विश्वास मात्र…

या नव्या निर्णयानुसार, प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी, तर द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रात प्रवेश घेता येईल. म्हणजेच, तीन किंवा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील या निर्णयाचा फायदा होईल. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे.

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसह लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची पुढील वर्गात प्रवेश घेण्याची पात्रता आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सम सत्राच्या परीक्षांऐवजी २०२४-२५ या वर्षातील विषम सत्राच्या निकालाच्या आधारे ठरवण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त संधी मिळेल आणि त्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता कमी होईल. विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी महत्त्वाची अटही घालण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषम सत्राच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे आवश्यक हमीपत्र भरून देणे बंधनकारक असेल. या सत्राचे परीक्षांचे आयोजन सम सत्राच्या परीक्षांसोबत एकत्रितपणे करण्यात येणार आहे.

JEE मेन रिजल्ट २०२५ जाहीर? येथे येईल पाहता, जाणून घ्या निकालासंदर्भात संपूर्ण माहिती 

हा निर्णय लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अपूर्ण अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होईल आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अडचणींवर मात करण्याचा मार्ग मिळेल. शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अधिक उंचावण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यांच्या करिअरच्या संधी वाढवण्यास सहाय्यक ठरेल.

Web Title: Students who fail in engineering will get admission in the next class

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
1

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
2

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम
3

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! अंतिम मुदत वाढवण्यात आली; लाखांच्या भरात प्रवेश
4

पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! अंतिम मुदत वाढवण्यात आली; लाखांच्या भरात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.