फोटो सौजन्य - Social Media
तमिळनाडूमधून एक प्रेरणादायी गोष्ट उभारून येत आहे. ही गोष्ट शिक्षणासंबंधित आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, तसेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही वयाच्या मर्यादा नसतात. याचे उत्तम उदाहरण तमिळनाडूच्या मायलेकी अमुथवल्ली मणिवन्नन आणि सम्युक्ता या दोघींनी दिली आहे. अमुथवल्ली मणिवन्नन वयाने ४९ वर्षांच्या असून त्या फिजिओथेरपिस्ट आहेत, तर त्यांचे लेक सम्युक्ता CBSE शिक्षण पद्धतीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. या दोघी मायलेकींनी सोबतच NEET परीक्षा एकत्र क्रॅक केली आहे. यांच्या यशामुळे देशभरातील अनेक महिलांना तसेच वयाच्या मर्यादेत मानसिकता हरपून बसलेल्या सर्व मानव जातील एक मोलाचा संदेश दिला आहे.
मुळात, अमुथवल्ली मणिवन्नन यांनी तीन दशकांपूर्वी डॉक्टर क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावेळी त्यासाठी त्यांनी अनेक परिश्रमही घेतले. या क्षेत्रासंबंधित शिक्षणही सुरु केले होते. पण काही अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. त्यांची मुलगी सम्युक्ताने नुकतेच CBSE बोर्डातून शिक्षण पूर्ण करत, वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. मुलीने NEET ची तयारी सुरु केली होती, हे पाहून आईलाही तिचे अनेक वर्षांअगोदरचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे मोह आवरले नाही. लेकीसोबत तिनेही NEET परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
NEET चा अभ्यास करताना सम्युक्ता जोरजोरात वाचन करायची, अमुथवल्ली मणिवन्नन तिचा जोरात असलेला अभ्यास ऐकून स्वतःही शिकत होती. अशाप्रकारे अभ्यासाची तयारी सुरु ठेवत अखेर दोघींनीही NEET परीक्षेत यश मिळवले आहे. अमुथवल्ली मणिवन्नन आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करणार असून, सम्युक्ता MBBS शिक्षणाकडे झेप घेणार आहे. मुळात, सम्युक्ताने NEET परीक्षेमध्ये ४५० गुण मिळवले आहे. तसेच या दोघी मायलेकींना सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून नेटकऱ्यांनी भार्भातून शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे.
वयाच्या 50 शीत अमुथवल्ली मणिवन्नन यांनी उचललेले हे पाऊल, अपूर्ण स्वप्न राहिलेल्या अनेक प्रौढ व्यक्तिमत्वांची एक प्रेरणा आहे.