Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPS Success Story: बॉलिवूडसाठी लिहले आहेत गाणे! कोण आहे हा डॅशिंग IPS अधिकारी?

IPS मुरलीधर शर्मा हे शिस्तप्रिय अधिकारी असूनही सर्जनशीलतेत आपली वेगळी छाप पाडत आहेत. ‘मृगया’ चित्रपटातील ‘शोर मचा’ या गाण्यामुळे ते आज चित्रपटसृष्टीतही चर्चेत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 03, 2025 | 08:25 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगाल पोलिस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी मुरलीधर शर्मा हे आज केवळ एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक क्रिएटिव्ह व्यक्तिमत्त्व म्हणूनही चर्चेत आहेत. पोलिस दलात आपल्या कडक शिस्तप्रिय स्वभाव, तीक्ष्ण बुद्धी आणि प्रामाणिक कामामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. गुन्हेगारी जगतातील अनेक मोठी प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या तपासून उकल केली असून, सामान्य नागरिकांचा पोलिस दलावर विश्वास टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलू म्हणजे त्यांचा साहित्यिक आणि कलात्मक आवडीनिवडींकडे असलेला कल. कविता, शायरी आणि गझल यांची आवड जोपासणारे शर्मा यांनी आता थेट चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

NHPC Non-Executive भरती 2025: २४८ पदांसाठी अर्ज सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

शर्मा यांनी बंगाली चित्रपट ‘मृगया’ साठी हिंदी आयटम साँग ‘शोर मचा’ लिहिले असून, हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आणि गायक राणा मजूमदार यांनी आपल्या सुरेल आवाजात या गाण्याला जिवंत केले आहे. या गाण्याला आकर्षक कोरिओग्राफीदेखील लाभली आहे, त्यामुळे चित्रपटात याचे महत्त्व अधिक वाढले आहे. जेव्हा चित्रपट निर्मात्यांना एक दमदार हिंदी आयटम नंबरची गरज भासली, तेव्हा मुरलीधर शर्मा यांनी स्वतः गीत लेखन करण्याची तयारी दर्शवली.

त्यांच्या शब्दांना चित्रपटाच्या दिग्दर्शकासह संगीत टीमने एवढे मनापासून पसंत केले की कोणतेही बदल न करता गीताला थेट मंजुरी मिळाली. जून 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या थ्रिलर चित्रपटात गुन्हे, पोलिस तपास आणि थरारक घटनांचा सुरेख संगम आहे. त्यात ‘शोर मचा’ या गाण्याने वेगळाच रंग भरला आहे.

विद्यार्थ्यांच्या तणाव व्यवस्थापनासाठी CBSE चा उपक्रम! करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड व हब-अँड-स्पोक मॉडेलमुळे विद्यार्थ्यांचा फायदा

हरियाणातील साध्या घरातून येणार्या मुरलीधर शर्मा यांनी UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून IPS पद मिळवले. भाषांवर त्यांची पकड विलक्षण असून हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि बांग्ला या चारही भाषांमध्ये ते सहजतेने लेखन करू शकतात. शिक्षणाच्या काळात ते गझल व शायरी लिहायचे. या छंदातूनच पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आपली छाप पाडली. एका बाजूला पोलिसांची जबाबदारी, गुन्ह्यांशी झुंज आणि शिस्तप्रियतेची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला साहित्यिक सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार! मुरलीधर शर्मा यांचे व्यक्तिमत्त्व हे दुहेरी पैलूंनी समृद्ध आहे. म्हणूनच ते फक्त शिस्तप्रिय आणि धडाडीचे अधिकारी नसून संवेदनशील व क्रिएटिव्ह लेखक म्हणूनही आज जनतेच्या चर्चेत आहेत.

Web Title: Success story of murlidhar sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC CSE Final Result 2025: या आठवड्यात येऊ शकतो अंतिम निकाल! करा तपासावा
1

UPSC CSE Final Result 2025: या आठवड्यात येऊ शकतो अंतिम निकाल! करा तपासावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.